Tarun Bharat

नॅशनल कॉन्फरन्सला मोठा झटका

देवेंद्र सिंह राणांची पक्षाला सोडचिठ्ठी

@वृत्तसंस्था / जम्मू

जम्मू-काश्मीरच्या मुख्य राजकीय पक्षांपैकी एक नॅशनल कॉन्फरन्सला रविवारी मोठा झटका बसला आहे. पक्षाचे प्रमुख हिंदू चेहरे म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र सिंह राणा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राणा हे फारुख अब्दुल्लांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी एक होते. केंद्रशासित प्रदेशातील संभाव्य निवडणुकीपूर्वी नॅशनल कॉन्फरन्सला हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

राणांसोबत एस. एस. सलाथिया यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. दोन्ही नेते सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मानले जातेय. जम्मू-काश्मीरमध्ये दोन्ही नेत्यांचा मोठा प्रभाव असल्याचे मानण्यात येते. देवेंद्र सिंह राणा यांनी 2014 मध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या तिकिटावर मोदी लाट असूनही नगरोटा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक जिंकली होती. ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना त्यांचे राजकीय सल्लागार म्हणून देवेंद्र राणा यांनी काम केले होते.

याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लीम-गुर्जर समुदायाचेही समर्थन त्यांना प्राप्त आहे. ते जम्मू-काश्मीरमधील वादग्रस्त नसलेले नेते म्हणून ओळखले जातात. तर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी सलाथिया आणि राणा यांचा राजीनामा मंजूर केला आहे. सलाथिया हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.

Related Stories

आत्मनिर्भरतेसाठी संरक्षण मंत्रालयाने उचलले पाऊल

Amit Kulkarni

राजस्थान : भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

नॅन्सी पेलोसींचा तैवान दौरा; चिनने दिला हा इशारा

Abhijeet Khandekar

… तर मोहन भागवत यांनाही अतिरेकी ठरवले जाईल; राहुल गांधींचा हल्लाबोल

Tousif Mujawar

बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्याचे मतदान

Patil_p

आसाममध्ये भूकंपाचे धक्के

datta jadhav