Tarun Bharat

नेक्ससमध्ये पर्यटन दिन साजरा

भित्तीचित्रे-विविध प्रांतातील खाद्यपदार्थ सादरीकरणाचे उद्घाटन

प्रतिनिधी / बेळगाव

राज्यात पर्यटनाला अनेक संधी आहेत. तरुणांनी याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. रोजगार वाढीसाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असून, तरुणांनी त्याचा लाभ घ्यावा, असे मत बेळगाव पर्यटन विभागाचे उपसंचालक जगदीश पाटील यांनी व्यक्त केले.

नेक्सस इंन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेच्या व्यवस्थापिका प्रीती पाटील, प्लेसमेंट अधिकारी विनायक महाडिक उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीचित्र व विविध प्रांतातील खाद्यपदार्थ सादरीकरणाचे उद्घाटन पाहुण्यांनी केले.

जगदीश पाटील यांनी कोरोनामुळे पर्यटन क्षेत्राचा कसा ऱहास झाला. याबद्दल मार्गदर्शन केले. पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर जगदीश पाटील, प्रीती पाटील, वन खात्याच्या कर्मचाऱयांनी गोडचीनमलकी येथे स्वच्छता केली.

Related Stories

जि.पं.मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी दिल्या विविध शाळांना भेटी

Patil_p

वसतीगृहातील 45 विद्यार्थिनींना अन्न विषबाधा

Patil_p

रविवारीही शहर परिसरात शांतता

Amit Kulkarni

‘ईडी’च्या नावे भल्याभल्यांसाठी रचले ‘सापळे’

Amit Kulkarni

फळांचे दर सामान्यांच्या आवाक्यात

Amit Kulkarni

धर्मांतर विरोधी नवा कायदा नको

Patil_p