Tarun Bharat

नेजल लसीच्या चाचण्यांना अनुमती

Advertisements

‘भारत बायोटेक’च्या प्रयत्नांना मिळतेय यश

नवी दिली / वृत्तसंस्था

‘भारत बायोटेक’द्वारे विकसित कोविड-19 साठी नाकातून दिल्या जाणाऱया लसीच्या दुसऱया टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. नाकाद्वारे दिली जाणारी ही देशातील पहिलीच नेजल लस असणार आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षणासह चाचणीपूर्व अभ्यासात ही नेजल लस सुरक्षित असल्याचे समोर आले होते. आता याच्या दुसऱया टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला परवानगी मिळाल्याची माहिती जैवप्रौद्योगिकी विभागाने (डीबीटी) दिली आहे. 18 वर्ष ते 60 वर्षादरम्यानच्या वयोगटातील व्यक्तींच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. ही लस बीबीवी 154 असून त्याची प्रौद्योगिकी भारत बायोटेकने सेंट लुईसस्थित वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी येथून मिळवली होती. पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल टप्प्यात सहभागी झालेल्यांना लावण्यात आलेली लस ही शरीरावर प्रभावशाली ठरली आहे. त्यांच्यावर कोणतेही गंभीर प्रभाव जाणवलेले नाहीत.

Related Stories

रामजन्मभूमी ट्रस्टच्या लोगोचे अनावरण

Patil_p

केंद्र सरकारच्या ‘आरोग्य सेतू’ वर राहुल गांधी यांच्याकडून प्रश्नचिन्ह

Rohan_P

‘मलाही पेगॅससची ऑफर’; ममता बॅनर्जींचा मोठा खुलासा

Abhijeet Shinde

कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी ऋतुराज अवस्थी

Patil_p

दिल्लीत दिवसभरात कोरोनाचे 44 नवे रुग्ण; 37 डिस्चार्ज!

Rohan_P

हरियाणा : डोंगर कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेत 25 जण दबल्याची शक्यता

Sumit Tambekar
error: Content is protected !!