Tarun Bharat

नेतृत्वबदलाबाबतच्या सर्व अफवांना पूर्णविराम देण्याची वेळ : महसूलमंत्री

Advertisements

प्रतिनिधी/प्रतिनिधी

कर्नाटकात भाजप नेतृत्व बदलाबत चर्चा सुरु आहेत. भाजपच्या काही नेत्यांनी वारंवार नेतृत्व बदलाची विधाने केली आहेत. तसेच भाजप हाय कमांडची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. परंतु भाजप हाय कमांडने अद्याप याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान भाजपच्या राज्यातील अनेक नेत्यांनी नेतृत्व बदल होणार नसल्याचे म्हंटले आहे. राज्याचे महसूलमंत्री आर. अशोक यांनीही राज्यातील नेतृव बदलाच्या चर्चा थांबवाव्यात अशी अपेक्ष व्यक्त केली आहे.

दरम्यान राज्याचे महसूलमंत्री आर. अशोक यांनी नेतृत्वबदलाबाबतच्या सर्व अफवांना पूर्णविराम लावण्याची वेळ आली असल्याचे म्हंटले आहे. तसेच मंत्री अशोक यांनी बी. एस. येडियुरप्पा हे आमचे नेते आहेत आणि ते मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील असे ते म्हणाले.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी रविवारी सांगितले की, पक्षात मुख्यमंत्री बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच येत नसल्याचे म्हंटले आहे. मुख्यमंत्री हे आमचे नेते आहेत.आम्ही सर्वांनी मिळून ते मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली होते. त्यामुळे मुख्यंमत्री येडियुराप्पा हेच मुख्यमंत्री राहतील असे त्यांनी म्हंटले आहे.

तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री डॉ. सी.एन. अश्वनाथनारायण यांनीही मुख्यमंत्र्यांनी पद सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हंटले आहे. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यांनी केवळ असे निवेदन केले की ते पक्षातील शिस्तबद्ध सैनिक असल्याने पक्ष घेत असलेल्या कोणत्याही निर्णयाचे पालन करण्यास तयार आहे, असे ते म्हणाले आहेत .

दरम्यान, पत्रकारांनी नेतृत्व बदलाच्या चर्चेविषयी मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी भाजप हाय कमांडचा त्यांच्यावर विश्वास आहे तोपर्यंत आपण राज्य सरकारचे नेतृत्व करत राहू, असे म्हंटले आहे.

Related Stories

पालकांच्या संमतीनंतरच भरणार शाळा

Patil_p

भारतीय सैनिकांकडून गलवान व्हॅलीमध्ये नवीन वर्ष साजरे

Sumit Tambekar

पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना; समर्थकांची नाराजी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार?

Abhijeet Shinde

कुपवाडमध्ये तरुणावर चाकूहल्ला : दोघांवर गुन्हा

Sumit Tambekar

मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Abhijeet Shinde

कर्नाटकातील ‘या’ चार जिल्ह्यात लॉकडाऊन निर्बंध शिथिल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!