Tarun Bharat

नेतृत्वावरुन गच्छंती, संघातून नारळ अन् आता इन्स्टाग्रामवरही अनफॉलो!

Advertisements

चेन्नई सुपरकिंग्सने रविंद्र जडेजाला अनफॉलो केल्याने नवे वादळ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

खराब फॉर्ममधील रविंद्र जडेजाला चेन्नई सुपरकिंग्सने इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले असून यामुळे बुधवारी नव्या वादंगाला सुरुवात झाली. यंदा जडेजाकडे नेतृत्व सोपवले गेल्यानंतर 8 सामन्यानंतर त्याला नेतृत्वावरुन पुन्हा पायउतार क्हावे लागले आणि मागील सामन्यात तर संघातून बाहेर बसण्याची नामुष्की त्याच्यावर आली. आता इन्स्टाग्रामवर चेन्नईने अनफॉलो केल्याने उभय घटकात सारे काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.

एरवी चेन्नई सुपरकिंग्स आपल्या संघात स्थैर्य राखण्यासाठी अधिक ओळखले जातात. मात्र, या हंगामात या प्रँचायझीत अनेक फेरबदल झाले आहेत. आयपीएल स्पर्धेला अवघ्या दोन दिवसांचा कालावधी बाकी असताना धोनीने नेतृत्वावरुन पायउतार होत जडेजाकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय झाला असल्याचे जाहीर केले. अर्थात, पहिल्या सत्रापर्यंत चेन्नईची कामगिरी खूपच खराब स्वरुपाची झाली आणि जडेजाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत राहिले.

जागतिक स्तरावरील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या जडेजाने सातत्याने अगदी सोपे झेलही सोडणे धक्कादायक होते. 8 सामन्यानंतर चेन्नईने जडेजाची नेतृत्वावरुन गच्छंती करत ही सूत्रे पुन्हा धोनीकडे सोपवली. आता चेन्नईने त्याला इन्स्टाग्रामवरुनही अनफॉलो केल्याने नवे वादळ सुरु झाले आहे.

Related Stories

वेस्टवूड वर्षांतील सर्वोत्तम गोल्फपटू

Patil_p

लांब उडीत नयना जेम्सला जेतेपद

Patil_p

अबिद, अझहरची शतके

Patil_p

वुल्व्ह्सची अर्सेनलवर मात, जिमेनेझला दुखापत

Patil_p

ख्रिस्तियानो रोनाल्डोचे दुहेरी गोल

Patil_p

इटलीचा बेरेटिनी अजिंक्य

Patil_p
error: Content is protected !!