Tarun Bharat

नेपाळच्या 150 हेक्टर जमिनीवर चिनी कब्जा

गलवान खोऱयातील संघर्षांनतरचा प्रकार : सैन्यतळाची करतोय निर्मिती

वृत्तसंस्था/ काठमांडू

भारत आणि चीन यांच्यातील पूर्व लडाखच्या गलवान खोऱयातील हिंसक झटापटीनंतर ड्रगनने नेपाळच्या 150 हेक्टर जमिनीवर कब्जा केला आहे. चीनने पाच मोर्चांवर यंदा मे महिन्यात नेपाळच्या जमिनीवर कब्जा करण्यास प्रारंभ केला आहे. नेपाळच्या भूमीवर कब्जा करण्यासाठी चीनने सीमेवर स्वतःचे सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे.

नेपाळच्या उत्तर-पश्चिम दिशेला असलेल्या हुमला जिल्हय़ात चिनी सैन्याने लिमी खोरे आणि हिल्स ओलांडून  सीमेवरील दगडी स्तंभ हटविले आहेत. हेच स्तंभ हटवून चीनने नेपाळच्या भूमीवर अतिक्रमण केले आहे. यानंतर चिनी सैन्याने तेथे आता सैन्यतळाची निर्मिती सुरू केली आहे.

पीएलएच्या सैनिकांनी गोरखा जिल्ह्य़ातही सीमेवरील स्तंभ काढून टाकले आहेत. याचप्रकारे नेपाळच्या रसुआ, सिंधूपालचौक आणि संकुवासभा जिल्हय़ांमध्येही चिनी सैन्याने जमिनीवर कब्जा केला आहे. हे कृत्य करण्यापूर्वी चीनच्या अभियंत्यांनी तिबेटमध्ये नद्यांचा प्रवाह बदलला आहे, या नद्याच नेपाळ आणि चीनमधील नैसर्गिक सीमेचे काम करायच्या.

आमच्या छोटय़ा देशाच्या तुलनेत 60 पट अधिक जमीन असूनही चीन नेपाळमध्ये घुसखोरी का करत आहे असा प्रश्न नेपाळी काँग्रेसचे खासदार जीवनबहादुर शाही यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नावर नेपाळ तसेच चीननेही उत्तर देणे टाळले आहे. केपी शर्मा ओली यांचे सरकार स्वतःचे मोठे व्यापारी भागीदार आणि क्षेत्रीय सहकारी चीन संतप्त होण्याच्या भीतीने या पूर्ण प्रकरणी मौन राखून असल्याचा आरोप नेपाळच्या नेत्यांनी केला आहे.

चीनने अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या कार्यकाळात आक्रमक विदेश धोरण अविलंबले आहे. नेपाळमध्येही त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बेल्ड अँड रोड अंतर्गत काम होणार आहे. चीनच्या सैनिकांनी सर्वप्रथम नेपाळच्या भूमीवर 2009 मध्ये कब्जा करण्यास प्रारंभ केला होता. तर चीनच्या अतिक्रमणामुळे स्थानिक नेपाळी नागरिक अत्यंत घाबरले आहेत. याचबरोबर रुई जिल्हय़ातही चीनने नेपाळी भूमीवर कब्जा केला आहे.

Related Stories

इस्रायल : एक-पंचमांश लोकसंख्येचे लसीकरण

Patil_p

म्यानमार स्थितीवर सुरक्षा परिषदेत चर्चा होणार

Patil_p

‘डीबीटी’चे आयएमएफकडून कौतुक

Amit Kulkarni

इराकच्या न्यायालयाकडून ट्रम्पविरोधात अटक वॉरंट

Patil_p

फ्रान्समध्ये तिसरी लाट

datta jadhav

जुळी लोकं राहणारे अनोखे बेट

Patil_p
error: Content is protected !!