Tarun Bharat

नेपाळमुळे बिहारला पूरस्थितीचा धोका

Advertisements

ऑनलाईन टीम / पटना :

भारत-नेपाळ सीमेवरील गंडक बराज धरणाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. मात्र, नेपाळने या धरणाजवळ भारतीय अभियंत्यांना प्रवेश नाकारला आहे. धरणाच्या डागडुजीचे काम अपुरे राहिले तर बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका अधिक आहे, असे बिहारचे जलसंपदा मंत्री संजय झा यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

झा म्हणाले, गंडक बराज धरणाला सध्या डागडुजी करण्याची गरज आहे. डागडुजीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची ने-आण करण्यावर नेपाळने निर्बंध आणले आहेत. तसेच भारतीय इंजिनियर्सला धरणाजवळ प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे धरणाची डागडुजी करता येणार नाही. तसे झाल्यास पावसाळ्यात गंडक नदीची पाण्याची पातळी वाढेल आणि बिहारमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. 

लाल बेकिया नदीजवळ धरणाच्या डागडुजीचे काम केले जात आहे. हा प्रदेश कोणत्याही देशाच्या अंतर्गत येत नाही. तरी देखील नेपाळने ठिकाणी डागडुजीची कामे थांवबली आहेत. गंडक बराज धरणाला ३६ दरवाजे आहेत. त्यापैकी १८ दरवाजे हे नेपाळमध्ये आहेत. 

Related Stories

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊच, पण त्याअगोदर 12 आमदार नियुक्तीचे प्रकरण निकाली काढा ; नवाब मलिकांचा राज्यपालांना टोला

Archana Banage

दीपक केसरकरांना पर्यटन खातं मिळण्याचे पुन्हा संकेत; उदयनराजेनंतर संभाजीराजेही केसरकरांच्या भेटीला

Abhijeet Khandekar

भारताची चिंता वाढली; ब्रम्हपुत्रा नदीवर चीन उभारणार धरण

datta jadhav

कॅनडात 12-15 वयोगटातील मुलांचे लसीकरण

Amit Kulkarni

नीरजची भालाफेक ऑलिम्पिकच्या 10 मॅजिकल मोमेंट्समध्ये!

Patil_p

पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे बिथरला रशिया

Patil_p
error: Content is protected !!