Tarun Bharat

नेमबाजीत मनीषला ‘सुवर्ण’; तर सिंघराजची ‘रौप्य’पदकाची कमाई

ऑनलाईन टीम / टोकियो :

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील पुरूषांच्या पी4 मिश्रित 50 मीटर पिस्तूल एसएच1 नेमबाजीत भारताच्या मनीष नरवालने सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर सिंघराजने रौप्य पदकाची कमाई केली. यामुळे आज नेमबाजीत भारताचा डबल धमाका पहायला मिळाला.

मनीष आणि सिंघराज यांच्यात सुवर्ण पदकासाठी कडवी टक्कर पाहायला मिळाली. यात 19 वषीय मनीषने बाजी मारुन भारताला तिसरं सुवर्ण पदक मिळवून दिले. मनीषने 218.2 च्या एकूण गुणांसह प्रथम स्थान मिळवले तर सिंगराजने 216.7 च्या एकूण गुणांसह द्वितीय स्थान मिळवले. पॅरालिम्पिकमधील भारताच्या पदकांची संख्या 15 झाली आहे. ज्यामध्ये 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे.

Related Stories

रॉबिन सिंगला 500 रुपयांचा दंड

Patil_p

झुंजार खेळ करूनही भारतीय महिला पराभूत

Patil_p

विश्व टेटे चॅम्पियनशिपमधून शरथ कमलची माघार

Patil_p

ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमधील महिलांचे उपांत्य सामने रात्रीच्या सत्रात

Patil_p

लिव्हरकुसेनच्या विजयात हॅवर्ट्झचे दोन गोल

Patil_p

कोविड टास्क फोर्सची बैठक मंगळवारी

Patil_p