Tarun Bharat

नेर्ले-कापुसखेड रस्त्यावर दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न

कासेगाव / वार्ताहर

वाळवा तालुक्यातील कापुसखेडहून नेर्ले येथे पाहुण्यांकडे आलेल्या भावंडावर गुरुवारी रात्री नर्लेहून कापुसखेडकडे परतत असताना बिबट्याने हल्याचा प्रयत्न केला. मात्र, मोटारसायकल स्वाराच्या प्रसंगाविधानामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर या भावंडांनी कापुसखेडच्या युवकांच्या मदतीने घटनास्थळी जाऊन बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत बिबट्या ऊसाच्या शेतात पसार झाला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी रात्री कापुसखेड येथील महाविद्यालयीन तरुण अनिकेत पाटील आणि त्याची बहीण मोटारसायकल वरून नेर्ले येथे पाहुण्यांकडे गेले होते. रात्री ९.३० वाजता मोटारसायकलवरून कापुसखेडकडे जात असतताना नेर्ले येथील कदम वस्तीनजिक ऊसातून आलेल्या बिबट्याने मोटारसायकल वरती झेप घेतली यावेळी अनिकेत याने प्रसंगासावधान राखून मोटारसायकलचा वेग वाढवला. तरीही बिबट्याने १०० ते १५० मीटर अंतरा पर्यंत अनिकेतच्या मोटारसायकलचा पाठलाग केला. त्याचवेळी कासेगाव येथील तिघेजण दोन मोटारसायकल वरून कापुसखेड कडून नेर्लेकडे जात होते. त्यावेळी बिबट्याने त्यांच्यादेखील मोटारसायकलचा पाठलाग केला. तिघांनी एकदम आरडाओरडा केल्यानंतर नजिकच्या उसात बिबट्याने धूम ठोकली. मात्र तिघेही घाबरले होते. त्यांनी नेर्ले येथे आल्यावर ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली

दरम्यान कापुसखेड येथील युवकांना याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन युवकांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कापूसखेड ग्रामपंचायतिच्या वतीने गावात दवंडी देण्यात आली आहे. ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी कापुसखेड-नेर्ले दरम्यान मोटारसायकल वरून प्रवास करू नये, प्रवासा दरम्यान सतर्कता बाळगण्याच्या सूचना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आल्याचे सरपंच मंदाताई धुमाळे यांनी सांगितले.

Related Stories

मिरज रेल्वे स्थानक परिसरात पोलीस चौकी करा

Archana Banage

NIA कडून पुन्हा PFI च्या २५ ठिकाणी छापेमारी, आठवड्याभरातील दुसरी मोठी कारवाई

Archana Banage

दिवे घाटात, माउली थाटात.!

Abhijeet Khandekar

बदलाची फक्त गुगली, दादांची विकेट वाचली!

Patil_p

युक्रेनमध्ये अडकले कर्नाटकचे ४०६ विद्यार्थी

Abhijeet Khandekar

व्हर्च्युअल विवाहसोहळ्यांनी पकडला वेग

Patil_p
error: Content is protected !!