Tarun Bharat

नेव्हीच्या सैनिकांना गोकुळच्या दुधाचा `’बुस्ट’

गोकुळ आणि नौदल सेनेत करार

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सिलेक्ट टेट्रापॅक (यु.एच.टी) दूध भारतीय नौदल सेनेला पुरवठा करण्याचा करार झाला असून गुरुवारी 22 हजार लिटर्स टेट्रापॅक दुधाची पहिली बॅच भारतीय नौदल सेना (नेव्ही) च्या कारवार (कर्नाटक) येथील तळावर पाठविण्यात आली. या गाडीचे पूजन व शुभारंभ संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांचे हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थित करण्यात आले.
उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिलेक्ट टेट्रापॅक (यु.एच.टी.) संघाने नव्याने उत्पादीत केलेले तसेच सामान्य तापमानामध्ये 180 दिवस टिकणारे गोकुळ ब्रॅण्डचे सिलेक्ट टेट्रापॅक दूध हे नवीन उत्पादन प्रथमच भारतीय नौदल सेनेच्या कर्नाटक येथील कारवार या सेंटरला 2 लाख 67 हजार लिटर्स दूध पुरवठा संघामार्फत होणार आहे. याचा गोकुळ परिवारातील सर्व घटकांना अभिमान आहे. याचे सर्व श्रेय संघाचे लाखो दूध उत्पादक, हितचिंतक व संघाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांना जाते. तसेच गोकुळ ब्रॅण्डची उत्पादने नेहमीच गुणवत्तपूर्ण असल्याने ग्राहकांनी गोकुळची उत्पादने खरेदी करून गोकुळला मानाचे स्थान निर्माण करून दिले आहे. अशी भावना चेअरमन विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

हा करार करण्यासाठी संघाचे मार्केटींग सुपरवायझर विक्रम कदम यांनी व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतल्या बद्दल त्यांचे कौतुक केले. भविष्यात अजून यात वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे मनोगत आवाहन चेअरमन पाटील यांनी केले.यावेळी भारत देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत व त्यांचे समवेत असणारे अधिकारी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांना गोकुळ परिवाराकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमास संचालक अरुण डोंगळे, बयाजी शेळके, बाबासो चौगले, अभिजीत तायशेटे, शशीकांत पाटील, नंदकुमार ढेंगे, किसन चौगले, सुजित मिणचेकर, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, करणसिंह गायकवाड, अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी सदाशिव पाटील, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटींग व्यवस्थापक हणमंत पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

पालघरमध्ये नवजात बाळाला कोरोनाची लागण, आईची चाचणी मात्र निगेटिव्ह

Tousif Mujawar

महापूर नियोजनावर आज महाचर्चा

Archana Banage

शहरात मास्कची सक्ती करा

Patil_p

स्थलांतर थांबवायचे असेल तर बोंडारवाडी धरण झालेचं पाहीजे

Patil_p

ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत गगनबावड्याची वैदेही पाध्ये प्रथम

Archana Banage

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणखीन शंभर कोटी पंधरा दिवसात येणार : सतेज पाटील

Archana Banage