Tarun Bharat

नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे फ्रान्सला जेतेपद

वृत्त संस्था/ मिलान

कायलीयान एम्बापेच्या निर्णायक गोलाच्या जोरावर रविवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात फ्रान्सने स्पेनचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. विश्वकरंडक विजेत्या फ्रान्स संघातील अनुभवी हुकमी स्ट्रायकर एम्बापेने खेळ संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना आपल्या संघाचा निर्णायक गोल केला. या स्पर्धेतील झालेल्या बेल्जियम विरूद्धच्या उपांत्य सामन्यात एम्बापेने शेवटच्या काही मिनिटामध्ये निर्णायक गोल करून फ्रान्सला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात  पहिल्या 7 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांनी बचावात्मक खेळावर अधिक भर दिला होता.

या सामन्यात खेळाच्या पूर्वार्धात फ्रान्सला आघाडी मिळाली असती फ्रान्सच्या बेंझेमाने स्पेनच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली. बेंझेमाने एम्बापेकडे पास दिला. पण, एम्बापेचा प्रयत्न स्पेनच्या सिझरने फोल ठरविला. स्पेनची गोल करण्याची संधी हुकली. स्पेनच्या टोरेसने फ्रान्सच्या सर्बिया जवळील चेंडूवर ताबा घेत फ्रान्सच्या गोलपोस्टच्या दिशेने फटका मारला पण फ्रान्सचा गोलरक्षक लोरिसने हा फटका अचूकपणे सोपविला. 63 व्या मिनिटाला फ्रान्सने गोल करण्याची संधी गमविली. यानंतर दोन मिनिटाच्या कालावधीत स्पेनचे खाते ओराझेबलने उघडले. यानंतर करीम बेंझेमाने फ्रान्सला बरोबरी साधून दिली. सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना एम्बापेचा दुसरा आणि निर्णायक गोल फ्रान्सला विजेतेपद मिळवून देण्यास महत्त्वाचा ठरला.

या स्पर्धेत तिसऱया स्थानासाठी झालेल्या सामन्यात युरोपियन चॅम्पियन्स इटलीने बेल्जियमचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात स्पेनचे दोन्ही गोल टोरेसने नोंदविले. फ्रान्सच्या एम्बापेने सलग सामन्यात गोल नोंदविले आहेत. या पूर्वीच्या झालेल्या 13 आंतरराष्ट्रीय सामन्यात एम्बापेने दोन गोल नोंदविले आहेत. फ्रान्स संघाचा हा सलग तिसरा विजय आहे.

Related Stories

स्टार्क, मार्श, स्टोईनिस भारत दौऱयातून बाहेर

Patil_p

सुरेश रैनाला पितृशोक

Patil_p

भारत अ संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे

Patil_p

ऑस्टेलियाची पुन्हा भारतावर आघाडी

Patil_p

मधल्या फळीत खेळण्याची अजिंक्य रहाणेची तयारी

Patil_p

इश्फाक अहमद केरळ ब्लास्टर्ससे हंगामी प्रशिक्षक

Patil_p