Tarun Bharat

नेस्लेच्या उत्पादनांना छोटय़ा शहरात प्रतिसाद

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एफएमसीजी क्षेत्रात कार्यरत असणाऱया नेस्ले इंडियाने कोरोना महामारीच्या काळात छोटय़ा शहरात चांगला व्यवसाय केला असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीच्या विकासासाठी छोटय़ा शहरांनी दिलेले योगदान लक्षात घेण्याजोगे असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन म्हणाले की, कंपनीने टायर टू, टायर थ्री आणि टायर फोर शहरांमध्ये विक्रीत चांगली वाढ दर्शवली आहे. या शहरातील ग्राहकांनी नेस्लेच्या उत्पादनांना मागणी नोंदवली असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा शहरीपेक्षा ग्रामीण भागांतील लोकांनी नेस्लेच्या उत्पादनांना पसंती दर्शवली आहे. मागणीतील वाढीमुळे कंपनीच्या उत्पन्नात वाढीची शक्यता नाकारता येत नाही. 1 ते 5 लाख लोकसंख्या असणाऱया शहरांमध्ये उत्पादनांच्या मागणीत चांगली वाढ दिसली आहे. कोरोनाकाळात या शहरांनी कंपनीला चांगला हात दिला आहे. या शहरांनी नोंदवलेली मागणी अधिक वाखाणण्याजोगी म्हणता येईल.

Related Stories

कर्मचाऱ्यांना आता कार्यालयातून करावे लागेल काम

Amit Kulkarni

ऑटो कंपन्यांचे पुढचे पाऊल

Patil_p

ई-रुपीची मर्यादा वाढविली

Patil_p

अव्हेन्यूच्या महसुलात 31 टक्के वाढ

Patil_p

लॅपटॉप चार्ज करणारी पॉवरबँक दाखल

Patil_p

भारती एअरटेलची ऍक्सिस बँकेसोबत भागीदारी

Patil_p