Tarun Bharat

नेहरू विद्यापीठात पुन्हा हिंसाचार

मुखवटाधारी दंगलखोरांकडून प्राध्यापकांना मारहाण

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. अनेक मुखवटाधारी दंगलखोरांनी आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांवर दगडफेक केली. तसेच विद्यापीठ विद्याथीं संघटनेचे अध्यक्ष आयशे घोष यांना मारहाण केल्याचे सांगण्यात येते. ही घटना रविवारी संध्याकाळी 5 वाजता घडली.

विद्यापीठाच्या साबरमती वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चावर मुखवटाधारी हल्लेखोरांनी लोखंडी सळय़ांनी हल्ला केला, असा आरोप करण्यात येत आहे. मुखवटाधारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित होते, असाही आरोप करण्यात आला. तथापि, परिषदेने तो नाकारला असून डाव्या विचारसरणीच्या गुंडांचे हे कृत्य असल्याचा प्रत्यारोप केला आहे.

घोष यांना मारहाण

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आयशे घोष या मोर्चात होते. त्यांना मुखवटाधाऱयांनी बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात आले. ते रक्तबंबाळ झाल्याचे व्हिडीओ चित्रणात दिसून येत होते. हल्ला नेमका कोणी केला हे समजू शकलेले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या हल्ल्यात चार प्राध्यापकांनाही जखमा झाल्या आहेत.

बॉक्स

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

हल्लेखार कोण होते, यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटना यांनी एकमेकांकडे बोट दाखविले आहे. राजकीय नेत्यांनीही आता या वादात उडी घेतली आहे. शशी थरूर आणि पी. चिदंबरम या ज्येष्ठ काँगेस नेत्यांनी हल्लेखोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे असल्याचा आरोप केला. विद्यापीठ परिसरात मुखवटाधारी आणि शस्त्रधारी जमावाच्या प्रवेशाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. तथापि, त्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट करत परिषदेने डाव्या संघटनांवर आरोप केला. अशा प्रकारचे हल्ले डाव्या संघटनांच्या गुंडांकडूनच केले जातात, हे पूर्वी अनेकदा स्पष्ट झाले आहे, असे म्हणणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिकाऱयांकडून मांडण्यात आले. या प्रकरणी सखोल चौकशीनंतर सत्य बाहेर येऊ शकेल, असे मत काही प्राध्यापकांनी व्यक्त केले.

धुमसते विद्यापीठ…

ड गेले पंधरा दिवस विद्यापीठात हिंसाचाराच्या घटना

ड नागरीकत्व सुधारणा कायद्याला डाव्यांकडून विरोध

ड अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कायद्याच्या बाजूने

 

Related Stories

दिल्लीतील भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची प्रकृती बिघडली

Amit Kulkarni

सागर राणाच्या हत्याकांडात सुशील कुमारसोबत सहभागी असलेल्या चार जणांना बेड्या

Archana Banage

भारतीय मुलीला जागतिक पुरस्कार

Patil_p

आमदार दुर्योधन ऐहोळे खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अध्यक्षपदी

Patil_p

कोविड नियम पाळण्याचे अखिलेश यांचे आवाहन

Patil_p