Tarun Bharat

नैराशेतुन रेल्वेखाली येऊन आत्महत्या

अक्कलकोट : प्रतिनिधी

मैंदर्गी येथील एका २४ वर्षीय तरूणाने नैराशेतुन अज्ञात रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. अमित शिवचलप्पा जकापुरे (वय- २४) रा.मैंदर्गी असे मयताचे नांव आहे. १७ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा ते १८ जानेवारी रोजी सकाळी सात वाजणेच्या दरम्यान इलेक्ट्रिक पोल क्रमांक ५१२/१२ ते ५१२/१४ रूद्धेवाडी ता.अक्कलकोट शिवारातील रेल्वे रूळावर रेल्वेने जोरात धडक दिल्याने गंभीर जख्मी होऊन जागीच मयत झाला. ही खबर नातेवाईक दरेप्पा बाळप्पा जक्कापुरे (वय ५२) मैंदर्गी यांनी दिली.

१७ जानेवारी रात्री अकरावाजल्यापासुन मयत अमित न आल्याने वडिलांनी शोधाशोध केली पण मिळुन आला नाही. सकाळी रेल्वेरूळावर छिनविछिन्न मृतदेह आढळला. हातावरील टँटु, मोबाईल कपड्यावरुन ओळख पटली. मरणापुर्वी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंक करून माझ्या मुत्यृस कोणासही जबाबदार धरु नका असे सांगुन चांगले मित्र मिळाल्याबद्दल आभार मानले असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. अधिक तपास पोलीस नाईक नबी मियावाले हे करीत आहेत

Related Stories

पोटच्या मुलाला पित्याने पंचगंगेत फेकलं

Archana Banage

ऐच्छिक एचआयव्ही टेस्ट करणाऱ्यांत वाढ

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये ३५७ कोरोनाबाधितांची भर

Archana Banage

डिझेल तब्बल ४० टक्क्यांनी महागलं, घाऊक खरेदीदारांच्या रांगा

Abhijeet Khandekar

अनंतनागमधील चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

सोलापूर ग्रामीण भागात 283 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, तर 9 जणांचा मृत्यू

Archana Banage