Tarun Bharat

नोंदणीकृत पत्रकारांना भरपाई द्यावी

महिला काँग्रेसतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन

प्रतिनिधी / पणजी

नोंदणीकृत पत्रकारांना भरपाई देण्याची मागणी करणारे निवेदन गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केले आहे. त्यांच्या समवेत त्यावेळी अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्या होत्या.

आल्तीनो येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महिला काँग्रेस शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. कोरोनाचे भय लॉकडाऊन चालू असताना पत्रकार जीवाची पर्वा न करता काम करीत आहेत. या संकटकाळात अनेक वृत्तपत्रांच्या चॅनेलांचा व्यवसाय थंडावला असून त्यांना नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक पत्रकारांचे वेतन करण्यात आले आहे. काम करुनही पत्रकारांनाही नुकसान सोसावे लागले. त्याची दखल सरकारने घेऊन पत्रकारांना काहीतरी भरपाई द्यावी, अशी मागणी डॉ. सावंत यांच्याकडे महिला काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. त्यावर विचार करण्याचे आश्वासन डॉ. सावंत यांनी त्यांना दिले.

Related Stories

बायोमिथेनेशन लघुप्रकल्पासाठी मुदतवाढीची मागणी

Amit Kulkarni

पणजीत डिसेंबरमध्ये 9 वी जागतिक आयुर्वेद परिषद

Amit Kulkarni

भाऊसाहेब नामकरणाचा निर्णय पुढे नेणार

Amit Kulkarni

सांखळी एसटी समाजाकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

Amit Kulkarni

पाच पालिकांसाठी 66.70 टक्के मतदान

Amit Kulkarni

एक एप्रिल पासून गोव्यात मद्याचे दर वाढणार

Tousif Mujawar