Tarun Bharat

नोंदणीकृत विवाहांमध्ये मोठी घट

कोरोना महामारीचा जपानवर प्रतिकूल प्रभाव

कोरोना संकटाने जगभरात जन्मदराला प्रभावित पेले आहे. तर प्रारंभी लॉकडाउनमुळे जन्मदर वाढू शकतो असे बोलले जात होते. जपानमध्ये 2020 साली जन्म दर नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. देशात कोरोना संकटाचा प्रभाव विविध स्वरुपात समोर येत असल्याचे जपानच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

महामारीमुळे अनेक लोकांनी विवाह टाळले आहेत. 2020 मध्ये जन्माला येणाऱया मुलांचे प्रमाण कमी होत 8 लाख 40 हजार 832 वर आले आहे. 2019 च्या तुलनेत हा आकडा 2.8 टक्क्यांनी कमी आहे. हा आकडा 1899 नंतरचा सर्वात कमी आहे. जपानमध्ये 121 वर्षांनी जन्मदरावरून अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जपानमध्ये नोंदणीकृत विवाहांच्या संख्येत 2020 मध्ये 12.3 टक्क्यांनी कमी होत 5 लाख 25 हजार 490 वर आली आहे. तर पूर्वी युद्धाच्या काळातच जपानमध्ये विवाह कमी व्हायचे. 2020 मध्ये जपानमध्ये प्रजनन दर कमी होत 1.34 वर आला आहे. हा आकडा जगात सर्वात कमी आहे. जपानमध्ये वृद्धांची संख्या टक्केवारीनुसार सर्वाधिक आहे.

युवांची संख्या कमी होत असल्याने कार्यबळ आपुंचन पावू लागले आहे. जपानला ‘सुपर-एज्ड’ देश म्हटले जाते. जपानची 20 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या 65 वर्षांपेक्षा अधिक वयाची आहे. दुसरीकडे चीनमध्ये नोंदणीकृत नवजातांच्या संख्येत 15 टक्क्यांची घट झाली आहे.

दक्षिण कोरियात वेगळेच संकट

जपानचा शेजारी देश दक्षिण कोरिया देखील अनेक वर्षांपासून कमी जन्म दराला तोंड देत आहे. 2020 मध्ये दक्षिण कोरियात जन्मापेक्षा अधिक मृत्यूंची नोंद झाली होती. संख्याशास्त्रात या स्थितीला ‘पॉप्युलेशन डेथ क्रॉस’च्या नावाने ओळखले जाते.

Related Stories

म्यानमारमध्ये भारतविरोधी संघटनांचा होणार खात्मा

Patil_p

10 वर्षीय भारतीय मुलीचा विश्वविक्रम

Patil_p

महामारीमुळे 1 अब्ज लोक दारिद्रय़ाच्या वाटेवर

Patil_p

युक्रेनियन कुटुंबाकडून 125 किलोमीटरची पायपीट

Patil_p

लंडनमध्ये ‘मुन्नी’ची धूम

Patil_p

दक्षिण कोरियात रूग्णवाढ

Patil_p