ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ग्रेटर नोएडा येथील ओप्पो कंपनीच्या फॅक्टरीतील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर फॅक्टरीतील सर्व काम बंद करण्यात आले आहे. 8 मे पासून या फॅक्टरीत काम सुरू करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चिनी मोबाईल हँडसेट सहनिर्मित ओप्पो कंपनीने निवेदन जारी करत सांगितले की, त्यांनी नोएडा येथील फॅक्टरीचे काम थांबवले आहे. तसेच जो पर्यंत त्यांच्या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांची म्हणजेच एकूण 3 हजार कर्मचाऱ्यांची कोरोनाची टेस्ट पूर्ण करून झाल्यावर फॅक्टरी पुन्हा सुरू केले जाईल.
कंपनीने उत्तर प्रदेश सरकारची परवानगी मिळाल्यानंतर तीस टक्के कर्मचाऱ्यांना घेऊन 8 मे रोजी ट्रॅक्टरचे काम सुरू केले होते. त्यानंतर आता कोरोनाच्या केसेस समोर आल्यावर पुन्हा एकदा काम पूर्ण बंद करण्यात आले आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना चाचण्या पूर्ण झाल्यावर काम सुरू केले जाईल.
तसेच यावेळी ज्यांची टेस्ट निगेटिव्ह असेल किंवा ज्या कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणे नसतील त्यांनाच काम सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. दरम्यान, आज आढळल्या सहा कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.