Tarun Bharat

नोएडा प्राधिकरणने सुरू केली ‘ऑक्सिजन बँक’

ऑनलाईन टीम / नोएडा : 


नोएडा प्राधिकरणकडून ऑक्सिजन सिलिंडर बँकची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे प्राधिकरण आता 5 लीटर क्षमतेचे सिलिंडर लोकांना देणार आहे. यासाठी शहरात 10 केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या सुविधेचा लाभ नागरिक आज पासून घेऊ शकणार आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सिक्युरिटी मनीच्या रुपात 2500 रुपये आणि रिलीफ करण्यासाठी 200 रुपये भरावे लागणार आहेत. सिलिंडर परत केल्यावर सिक्युरिटी मनी नागरिकांना परत दिला जाणार आहे. 


नोएडा प्राधिकरणचे महाप्रबंधक पी.के. कौशिक यांनी सांगितले की, गाव आणि सेक्टरमध्ये होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी ऑक्सिजनची सुविधा दिली जाऊ शकते, पण त्यांच्याकडे सिलिंडर उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे अशा लोकांना नोएडा प्राधिकरणने सिलिंडरसह ऑक्सिजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


अडाणी ग्रुपकडून देण्यात आलेले 5 लिटरचे क्षमतेचे 100 सिलिंडर येथे वापरले जाणार आहेत. हे सिलिंडर 7 दिवसांच्या आत परत करावे लागणार आहेत. तसेच सिलिंडर घेण्यासाठी आधार कार्ड, डॉक्टरांची चिठ्ठी, ऑक्सिजन लेव्हलचा रिपोर्ट आणि कोरोना टेस्टचा रिपोर्ट द्यावा लागणार आहे. ऑक्सिजन सिलिंडर सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत दिले जाणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

Related Stories

आंध्रात बस अपघातात सात वऱहाडींचा मृत्यू

Patil_p

दारूवर 70 टक्के ‘स्पेशल कोरोना टॅक्स’

datta jadhav

बारावीचे ‘रिपिटर्स’ही परीक्षेविना उत्तीर्ण

Patil_p

हे अमेरिकेचे न्यायालय नव्हे!

Patil_p

भारतीय सीमेवर तैनात, चिनी सैनिकाला रडू आवरेना

Patil_p

केरळ विधानसभेत बेदम हाणामारी

Patil_p
error: Content is protected !!