Tarun Bharat

नोकरीतील निमूटपणे काम करणे

नोकरी करताना आपल्याभोवती विविध प्रकारचे लोक असतात. लौकिकार्थाने यामध्ये आपले अधिकारी, सहकारी यांचा समावेश असतो. आपल्यासोबत काम करणे, कामात सहकार्य करणे व वरि÷ आणि अनुभवी म्हणून आपल्याला मार्गदर्शन करणे ही सारी कामे हीच मंडळी करीत असतात. थोडक्मयात म्हणजे प्रत्येक कर्मचाऱयाला त्याचे काम सुकर अथवा मुश्कील करण्यामध्ये त्याचे सहकारी अधिकारी सहभागी होतात. प्रसंगी कर्मचाऱयांना काही ना काही कारणाने नोकरी सोडून जाण्यासाठी सुद्धा हीच मंडळी कारणीभूत असतात. त्यामुळे नोकरीत निमूटपणे काम करणे अथवा ते अशक्मय झाल्यास नाईलाज वा प्राप्त परिस्थितीत उपाय म्हणून राजीनामा देण्याचा मार्ग बहुसंख्य कर्मचारी चोखाळतात. जगरहाटी असली तरी त्यावर काही पर्यायी विचार होऊ शकतो का? हा मूळ प्रश्न मात्र कायमस्वरुपी कायमच असतो.

कर्मचाऱयांचे राजीनामे देणे व नोकरी सोडून जाणे याची काही पूर्वपीठिका वा कारणमीमांसा असते. याची सुरुवात कुठल्याशा घटनाक्रम वा प्रसंगापासून होते. त्यानंतरच्या टप्प्यात संबंधित कर्मचाऱयांमध्ये अनाकलनीय बदल होतात. त्यामध्ये कर्मचाऱयांच्या बोलण्या-चालण्यापासून व्यक्तिगत प्रतिसाद वा कामकाजापर्यंत होतो. सद्यस्थितीतील यातील दृश्य परिणाम म्हणजे कर्मचाऱयांचे कथित स्वरुपातील नियमानुसार वा माफक काम करणे, 10 ते 5 स्वरुपात पाच वाजता लॅपटॉप वा कामकाज बंद करणे, वागणे-व्यवहारात त्रयस्थपणा येणे या स्वरुपात होऊ शकतात. या साऱयाचीच परिणती अशा कर्मचाऱयांनी निमूटपणे राजीनामा देण्यात, विशेष काही न बोलता नोकरी सोडण्यात होत असते.

याउलट अनावश्यक वा अतिरिक्त काम, कर्मचाऱयांची वैयक्तिक वा कौटुंबिक कारणे, उच्चशिक्षण, दैनंदिन प्रवास व त्याचप्रमाणे वाढीव पगारासह उच्चपदावरील संधी या कारणांमुळे कर्मचाऱयांचे राजीनामा देणे हे प्रचलित प्रकार समजले जातात व त्यात काही वावगे नाही. मात्र, कर्मचाऱयांच्या कथित अबोल्यासह म्हणजेच काही न बोलता-सांगता राजीनामा देणे व्यवस्थापनाच्या संदर्भात विचारणीय ठरते व त्यावर दोन प्रकारे विचार केला जाऊ शकतो.

यातील पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण मनाविरुद्ध वा इच्छेविरुद्ध कुठवर व का म्हणून काम करावे? त्याच्याच जोडीला आपल्या वैयक्तिक-कौटुंबिक जीवनशैलीचा त्याग करून काम करावे का? याच्याच जोडीला एक वास्तव प्रत्येकाला आठवते, की आपल्या शैक्षणिक पात्रता-योग्यतेच्या आधारे वैयक्तिक प्रगती व आर्थिक उत्पन्न-उन्नतीसाठी नोकरी-रोजगार करणे तर आवश्यक असते. या द्विधाकारक प्रश्नांचे उत्तर काढून मार्गक्रमण करणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे.

या प्रमुख व नेमक्मया प्रश्नांचे उत्तर म्हणून बहुसंख्य कर्मचारी हे सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे कामाच्या ठिकाणी व कामकाजाच्या संदर्भातील प्रश्नांवर एकमेव व टोकाचा उपाय म्हणून राजीनामा देऊन अन्यत्र नोकरी करण्याचा पर्याय शोधतात. अर्थात नोकरी सोडून अन्यत्र जाण्याचा व अशाप्रकारे नोकरी आणि कंपन्यांमध्ये बदल करण्याचा क्रम प्रामुख्याने आढळून येत असला व अनेकांचा तो अनुभव पण असला तरी नोकरदार आणि नोकरीच्या संदर्भातील विविध मुद्दे व समस्यांवर नोकरीतील धरसोड हा उपाय कितपत प्रभावी व परिणामकारक ठरू शकतो? हा प्रश्न मात्र अनेकांची पाठराखण करीत असतो. याशिवाय यावर व्यवस्थापकीय दृष्टीकोनातून विविध प्रकारची धारणा प्रचलित असते. विशेषतः शिक्षण संपवून नव्याने करिअर सुरू करणाऱया उमेदवार-कर्मचाऱयांमध्ये आपली नोकरी व रोजगार यामध्ये बदल करण्याची प्रवृत्ती मोठय़ा प्रमाणावर असते. मर्यादित अनुभव असणाऱया या नवागतांना सुरुवातीला तरी सहजगत्या नोकऱया मिळतात. मात्र, व्यवस्थापनाच्या संदर्भात करिअरच्या पहिल्या टप्प्यात वारंवार नोकरी बदलणाऱया उमेदवारांकडे मात्र मर्यादित स्वरुपातील कार्यक्षम, मानसिक अस्थिरता असणारे, कामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पेरणा नसणारे व कामाकडे गांभीर्याने व कल्पकपणे न पाहणारे अशा स्वरुपात पाहिले जाते.

बॉम्बे शेविंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू देशपांडे यांनी नव्याने करिअर सुरू करणाऱया नवागतांना दिलेला सल्ला फार महत्त्वाचा ठरतो. त्यांच्या मते नव्याने नोकरी सुरू करणाऱयांनी कामाची वेळ व ताणतणाव यासारख्या कारणांनी वारंवार नोकरी सोडणे हे दीर्घकालीन स्वरुपात त्यांच्यासाठी लाभदायी नसते. अस्थिरता-चंचलता यासारख्या मानवीय वा मानसिक बाबी बाजूला ठेवल्या तरी असे नवे उमेदवार-कर्मचारी आपल्या शिक्षणाला प्रशिक्षणाची जोड देऊन संबंधित विषय-क्षेत्राचे परिपूर्ण तर सोडाच, पण प्राथमिक ज्ञानसुद्धा प्राप्त करू शकत नाहीत. सर्वसाधारणपणे नवे उमेदवार नोकरीसाठी अर्ज करताना अथवा मुलाखतीच्या वेळी त्यांची शिक्षणाव्यतिरिक्त असणारी शिकण्याची आस, विषयाशी निगडित प्रशिक्षणाकडे त्यांचा असणारा कल, त्यासाठीची जिद्द वा चिकाटी यांचा लेखी-तोंडी उभय पद्धतीने ठामपणे उल्लेख करतात. त्यामुळे त्यांच्या नोकरीतील निवडीसाठी या मुद्दय़ांना महत्त्व दिले जाते. मात्र अशा उमेदवारांनी अल्पकाळात नोकरी बदल करणे म्हणजे व्यवस्थापक व व्यवस्थापनांच्या दृष्टीने विरोधाभास ठरतो.

वयोमानाच्या दृष्टीने सांगायचे झाल्यास काम ते कुठल्याही प्रकारचे वा स्वरुपाचे असो, त्यामध्ये नव्याने येणाऱयांनी पहिल्या 8-10 वर्षात अधिकाधिक प्रयत्न आणि वेळ देऊन करणे फार गरजेचे असते. मात्र, या प्रयत्नांना शिक्षणासह कल्पकतेची व जिद्दीची जोड देणे तेवढेच आवश्यक असते. या कामकाज पद्धतीने आयुष्यातील विविध टप्प्यांवर आपल्या व्यक्तिगत उद्देशांसह आपली कार्यक्षमता व विकास यांचा समन्वय मात्र साधायला हवा व त्याची सांगड आपल्या कंपनी-संस्था इत्यादीच्या व्यापक उद्दिष्टांशी यशस्वीपणे झाली तर यश सहजसाध्य असते. यासाठी वारंवार वा नेहमी कंपनी बदलणे नव्हे तर स्वतःमध्ये गरजेनुरुप बदल करणे जरुर असते.

प्रत्येकाने निमूटपणे व वैतागून नोकरी सोडण्याशिवाय शांतपणे मात्र ठरवून व जिद्दीने प्रयत्न करावेत. थोडा वेळ लागला तरी बदल निश्चितपणे होतील. आपले  काम केवळ नेमून दिल्यानुसारच नव्हे तर अधिक दर्जेदार करण्याचा अवश्य प्रयत्न करावा. आपली प्रतिमा कामाच्या संदर्भात ‘सांगकाम्या’ अशीच मर्यादित न ठेवता काही वर्षांच्या प्रयत्नांनी व प्रयत्नांती ‘सांगकाम्या’ची करण्याचा जरुर प्रयत्न करावा. अधिकारी-सहकाऱयांशी वागताना आदर आणि अधिकार केवळ पद-प्रति÷sने वा मागून मिळत नाही तर तो आपल्या कार्यकर्तृत्वाने मिळवावा लागतो. हे सारे होण्यासाठी अर्थातच धीराने व प्रसंगी अधिक काळ आपापल्या कामावर लक्षपूर्वक काम करणे, हे अंतिमतः फायद्याचे ठरते.

– दत्तात्रय आंबुलकर

Related Stories

मोदी वि. ठाकरे-पवार! थेट सामन्याची चिन्हे!!

Patil_p

निखळ गुणवत्तेचे निर्भेळ यश !

Patil_p

तव मायेच्या मोहें

Patil_p

अन्नाची नासाडी आणि वाढती उपासमार

Patil_p

सायकल आणि पोलीस

Patil_p

कोकणातील चौपदरीकरणासाठी अजून दोन वर्षांची प्रतीक्षा!

Patil_p