सोशल मीडियाच्या मदतीने 12 मुलांचे करतेय पोषण


ब्रिटनी चर्च नावाच्या 33 वर्षीय महिलेने स्वतःची नोकरी सोडून घरी बसण्याचा निर्णय घेतला. 12 मुलांची आई आता केवळ फोनवर व्हिडिओ तयार करून मोठय़ा आकाराच्या कुटुंबाचे पोषण करत आहे. तिला फॅक्ट्रीतील नोकरीदरम्यान कित्येक तास घराबाहेर रहावे लागत होते. परंतु आता ती घरबसल्या व्हिडिओ तयार करते आणि यातून मिळणाऱया पैशांमधून स्वतःचे घर आरामात चालवत आहे.
12 मुलांचे कुटुंब म्हणजे प्रचंड खर्च असतो. त्यांना दर महिन्याला हजारो रुपये केवळ खाण्यापिण्यावर खर्च करावे लागतात. त्यानंतर मुलांचे कपडे डायपरवरील खर्च वेगळा असतो. अमेरिकन महिला ब्रिटनीला यासाठी अधिक संघर्ष करावा लागत नाही, कारण तिने स्वतःचा बिझनेस सुरु केला आहे.
एकेकाळी फॅक्ट्रीत काम करणाऱया ब्रिटनीचा नवा बिझनेस तिचे सोशल मीडियावरील करियर आहे. ती घरबसल्या दररोज स्वतःच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओ तयार करून टिकटॉकवर अपलोड करते आणि यातून चांगले पैसे कमाविते.
टिकटॉकवर ब्रिटनीचे 1.8 दशलक्ष फॉलोअर्स असून हेच मिळून तिच्या घराचा खर्च उचलत आहेत. ब्रिटनीला मिळणाऱया ह्युजपासून ती पैसे कमाविते आणि तिला याकरता कुठेच जावे लागत नाही.
8 मुले असेपर्यंत मी नोकरी करत राहिले, परंतु एकाचवेळी तीन मुलांना जनम दिल्यावर नोकरी सोडली आणि सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करू लागल्याचे ती सांगते. तिच्या व्हिडिओजना 53 दशलक्षांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. क्रिएटर्स फंडमधून या ह्यूजकरता ती पैसे कमावत आहे.
टिकटॉकसह इन्स्टाग्रामवर देखील ब्रिटनची लाखो फॉलोअर्स आहेत. दर आठवडय़ाला 23 हजार रुपये खाण्यावर खर्च करावे लागतात. 66 कार्टन दूध आणतो आणि 600 डायपर्सची गरज दर आठवडय़ाला भासत असल्याचे ती सांगते.