Tarun Bharat

नोबेल विजेत्यांना लाभले बेळगावच्या सुपुत्राचे सहकार्य

Advertisements

आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेल्या संशोधनामध्ये  डॉ. समर्थ कुलकर्णी यांचा सहभाग

बेळगाव / प्रतिनिधी

मनुष्याच्या जनुकीय आजारावर प्रभावी ठरेल असे संशोधन केल्याबद्दल यंदाचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार डॉ. इमॅन्युएल शार्पेंटियर व डॉ. जेनिफर डोडणा या दोन महिला शास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे. बेळगावकरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे या संशोधनासाठी त्यांना बेळगावचे सुपुत्र डॉ. समर्थ कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

इमॅन्युएल शार्पेंटियर व जेनिफर डोडणा या दोन महिला शास्त्रज्ञांनी क्रिस्पर/कॅस 9 हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. जे जनुकीय आजारावर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरेल. या संशोधनामुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील जनुकीय दोष काढण्यासाठी डीएनएमधील दोष असलेल्या नेमक्मया जनुकापर्यंत जाऊन त्याला छेद देऊन तो एडिट करणे शक्मय होणार आहे. सिकल सेल ऍनिमियासारख्या आनुवंशिक आजारांबरोबरच विस्मरण -स्मृतिभ्रंश या आजारांसाठीही हे संशोधन उपकारक ठरणार आहे. डॉ. इमॅन्युएल शार्पेंटियर या क्रिस्पर थेराप्युटिक संस्थेच्या सहसंस्थापक असून याच संस्थेमध्ये डॉ. समर्थ कुलकर्णी सध्या सीईओ म्हणून कार्यरत आहेत. डॉ. शार्पेंटियर व डॉ. जेनिफर यांनी डॉ. समर्थ यांचा विशेष उल्लेख करत आपल्याला नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी डॉ. समर्थ कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले, असे नमूद केले आहे.

डॉ. समर्थ कुलकर्णी हे बेळगावचे असून त्यांचे माध्यमिक शिक्षण बेळगाव मिलिटरी स्कूलमध्ये झाले आहे. जीएसएस महाविद्यालयातून पदवीपूर्व शिक्षण घेतल्यानंतर आयआयटी खरगपूर येथून त्यांनी बीईची पदवी घेतली. अमेरिकेत जाऊन नॅनो टेक्नॉलॉजी विषयामध्ये एमएस व पीएचडी केली आहे. बेळगावचे नेत्रतज्ञ डॉ. सुरेश कुलकर्णी आणि निवृत्त प्राचार्या शोभा कुलकर्णी यांचे समर्थ हे चिरंजीव आहेत. नोबेल पुरस्काराच्या स्वरुपात आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेल्या संशोधनामध्ये बेळगावच्या या सुपुत्राचा सहभाग ही तमाम बेळगावकरांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.

Related Stories

नंदन मक्कळ धामला हय़ुमॅनिटी ग्रुपतर्फे साहित्याचे वाटप

Amit Kulkarni

सुलतानपूरला पोलीस छावणीचे रूप

Patil_p

खानापूर शहर-तालुक्यात दीपावली उत्साहात साजरी

Amit Kulkarni

पार्वतीनगर येथे तिघा मटकाबुकींना अटक

Omkar B

वेटलिफ्टिंग स्पर्धेत वैभवी, श्वेता यांना रौप्य

Amit Kulkarni

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 8 हजार 767 अर्ज दाखल

Patil_p
error: Content is protected !!