Tarun Bharat

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेठ वडगाव येथे शेतकरी परिषद

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती, सदाभाऊ खोत यांची माहिती, मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी

कोल्हापूर/प्रतिनिधी

राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर व्यापक चर्चा आणि विचार मंथन घडवून आणण्यासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे भव्य शेतकरी परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, भाजपच्या किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माजी कृषी राज्यमंत्री रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावेळी खोत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे अशी टीका ही त्यांनी केली.

कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, प्राध्यापक एम. डी. चौगुले, विवेक चव्हाण, अमित घाट, आकाश राणे, बाळासाहेब पाटील, शिकांत घाटगे सरकार आदी उपस्थित होते.

Related Stories

साप चावल्याने धुंदवडे पैकी चौधरवाडी येथील युवकाचा मृत्यू

Archana Banage

कोल्हापूर : धारवाडच्या कर्नाटक युनिव्हर्सिटीमधून शिरोळमधील स्मिता माने यांची पीएचडी

Archana Banage

राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने राजकारण नको!

Archana Banage

एकरकमी फायनल, आता प्लस किती?

Archana Banage

आता घरबसल्या मिळणार ग्रामपंचायतीचे दाखले

Archana Banage

शरद इन्स्टिट्यूटवर ४ हजार जागांसाठी रोजगार मेळावा-राजेंद्र पाटील-यड्रावकर

Archana Banage