Tarun Bharat

नोव्हेंबरमध्ये वॉर्डविझार्डची दुचाकी विक्री दुप्पट

नवी दिल्ली

  इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटीची विक्री वर्षभराच्या आधारावर या वर्षी नोव्हेंबरमध्ये 7,123 युनिट्स इतकी दुप्पट झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने 3,290 वाहनांची विक्री केली होती. गेल्या महिन्याच्या विक्रीच्या आकडेवारीनुसार ही कंपनीची आतापर्यंतची सर्वोत्तम मासिक कामगिरी राहिली आहे. वॉर्डविझार्डचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यतीन गुप्ते यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘बाजार सतत विस्तारत आहे आणि पुरवठा साखळी देखील सुधारली आहे. ज्यामुळे आम्ही अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकलो आहोत. आम्ही विक्रीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. येत्या काही महिन्यातही विक्रीचा वेग कायम राहील अशी अपेक्षा आहे’.  

Related Stories

एलआयसी अध्यक्ष एम.आर.कुमार यांना मिळाली मुदतवाढ

Patil_p

शेअर बाजाराचा आठवडय़ाचा शेवट मोठय़ा घसरणीने

Patil_p

रत्न,आभूषण निर्यात 20 टक्क्यांनी वाढली

Patil_p

सलग दुसऱया महिन्यात एफपीआय गुंतवणूक तेजीत

Patil_p

मारुती सुझुकीची नवी इर्टिगा लवकरच होणार लाँच

Patil_p

नाल्कोचा नफा 10 टक्क्यांनी वाढला

Amit Kulkarni