Tarun Bharat

नो रिटेक परफॉर्मन्स… कमलेश भडकमकर यांची दाद

सा रे ग म प ‘म्हटलं की स्पर्धक, परीक्षकांच्या बरोबरीनेच आठवतो तो स्पर्धकांना दमदार साथ करणारा वाद्यवृंद. अंताक्षरी स्पर्धा ते रिऍलिटी शो हे स्थित्यंतर अनुभवलेल्यांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे प्रसिद्ध संगीत संयोजक कमलेश भडकमकर! सांगितिक स्पर्धेच्या गर्दीतही स्वतःचं स्थान कायम राखणाऱया ‘सारेगमप’च्या लोकप्रिय वाद्यमेळाचं सुकाणू पहिल्या पर्वापासून त्यांच्याच हाती आहे. ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ हे नवं पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळतोय.

‘सारेगमप’ने वादकांना ओळख मिळवून दिली. त्याविषयी कमलेश सांगतात, ‘सारेगमपमध्ये एवढी गाणी सादर झाली आहेत की आज आमच्या ग्रुपकडे साधारण आठ-दहा हजार गाण्यांची नोटेशन्स तयार आहेत. त्याचा आम्हाला आता खूप फायदा होतो.’ झी मराठी आणि ‘सारेगमप’ने वादकांना घराघरांत पोहोचवलं.  एवढी लहान मुलं आणि एवढी मोठी जबाबदारी, म्हटल्यावर त्यांची तयारी करून घ्यावीच लागत असणार. त्याबद्दल कमलेश म्हणाले, ‘लिट्ल चॅम्प्सचं पहिलं पर्व आणि आताचं पर्व यामध्ये 12 वर्षांचा काळ लोटला आहे. पर्वागणिक काही तरी वेगळं असायला हवं वादक म्हणून लहान मुलांना संधी देणं हा असाच एक अनोखा प्रयोग!

‘सारेगमप’ हे एकही रीटेक न घेण्याबद्दल ओळखलं जातं आणि सांगताना आनंद वाटतो की छोटे वादक असूनही या पर्वातसुद्धा अद्याप एकही रिटेक झालेला नाही. आजवर ‘सारेगमप’ची 14 पर्व झाली. स्पर्धक लहान असोत वा मोठे; आम्ही रिटेक घेत नाही हे मी अतिशय ठामपणे सांगू शकतो.

Related Stories

दुबईत एअर कारचे उड्डाण

Amit Kulkarni

पावनखिंडचा थरार चित्रपटगृहातच

Patil_p

‘सोनी सब’ वर पुन्हा एकदा ऑफिस ऑफिस

Omkar B

महाराष्ट्रातील सर्वात वादग्रस्त निवडणूक ‘भाडिपा’ आणणार डिजिटल माध्यमांवर

Patil_p

टॉमशी विवाह केल्याने कारकीर्द बुडाली

Patil_p

रश्मिका मंदाना टॉप इन्स्टाग्राम सेलेब्रिटी

Patil_p