Tarun Bharat

नौकेच्या मदतीने दुमजली घराचे स्थलांतर

सरोवरातून घरासह केला प्रवास

प्रत्येकाने जीवनात कधी ना कधी स्वतःचे घर शिफ्ट केले असेल. ज्याने हा प्रकार अनुभवला आहे, त्यालाच शिफ्टिंग किती अवघड असते हे माहित असते.  शिफ्टिंगदरम्यान अनेक मूल्यवान सामग्रीचे नुकसान होत असते. पण अखेरीस नव्या ठिकाणी राहायला गेल्यावर मिळणारी अनुभवी सर्व जखमांवर मलम लावणारी असते. कॅनडाच्या न्यूफाउंडलँडमध्ये एका दांपत्याने ज्या पद्धतीने स्वतःचे घरच शिफ्ट केले, ते पाहून लोक अवाप् झाले आहेत. दांपत्याने स्वतःचे दोन मजली घर नौकेवर ठेवून एका सरोवरातून ते दुसऱया ठिकाणी हलविले आहे.

8 तासांचा कालावधी

डॅन्निली पेन्नी आणि त्यांचा प्रियकर किर्क लॉवेल यांनी 11 ऑक्टोबर राजी 6 हून अधिक नौकांवर स्वतःचे दोन मजली घर ठेवले, त्यानंतर सुमारे 8 तासांमध्ये त्यांनी हे घर अन्यत्र हलविले आहे.

क्रेनचा वापर

हे घर हलविणे सोपे नव्हते. वाटेत एका नौकेत बिघाड झाल्याने घर खाली सरकू लागले होते. पण अखेरीस घर पाण्यात कोसळण्यापासून वाचविण्यात आले. जर हे घर रस्तेमार्गाने हलविण्यात आले असते तर अनेक अडचणी आल्या असत्या, याचमुळे जोडप्योन पाण्याच्या मार्गाने घर हलविण्याचा विचार केला आणि तो अंमलातही आणला आहे.

Related Stories

ब्राझील : तयारी गतिमान

Patil_p

तिसऱया लाटेमुळे फ्रान्स ‘लॉकडाऊन’

Patil_p

दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे 5 सैनिक ठार

Amit Kulkarni

चीनकडून सिनोफार्मच्या लसीला मंजुरी

Patil_p

इराणमध्ये अणुशास्त्रज्ञाची दहशतवाद्यांकडून हत्या

Patil_p

सर्वात मोठय़ा जहाजावर घर खरेदीची संधी

Patil_p