Tarun Bharat

नौदलाचे 21 जवान कोरोनाग्रस्त

मुंबईमध्येच ‘आयएनएस आंग्रे’वर तैनात : नौदलाच्या रुग्णालयात क्वारंटाईन

वृत्तसंस्था/ मुंबई

देशभरात कोरोनाने थैमान घातले असतानाच भारतीय नौदलाचे 21 जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला. या सर्व जणांना मुंबईतील नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामधील 20 जण मुंबईमध्येच ‘आयएनएस आंग्रे’वर तैनात होते. यामधील बहुतांशी जणांमध्ये सुरुवातीला कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. यापूर्वी लष्करामधील जवानांना कोरोनाचा फैलाव झाल्याचा प्रकार घडला होता. मात्र, नौदलाच्या जवानांना कोरोनाची बाधा झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

‘आयएनएस आंग्रे’वर तैनात 20 जवानांच्या संक्रमणाचा स्रोत एकच आहे. 7 एप्रिल रोजी नौदलाच्या एका जवानाला कोरोनाचे संक्रमण झाल्याची माहिती उपलब्ध झाली होती. याच जवानाच्या माध्यमातून बोटीवर तैनात असलेल्या अन्य 20 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा केला जात आहे, अशी माहिती भारतीय नौदलाकडून देण्यात आली. शनिवारी याबाबतची माहिती नौदलाकडून देण्यात आल्यानंतर ‘आयएनएस आंग्रे’वरील 20 जवानांना नौदलाच्या मुंबईतील ‘आयएनएचएस’ रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले.

लष्कराच्या 8 जवानांना कोरोना संक्रमण

लष्करामध्ये एकूण 8 कोरोना संक्रमणाचे रुग्ण आढळून आल्याची माहिती भारतीय लष्कराचे प्रमुख एम. एम. नरवणे यांनी दिली. यामध्ये दोन डॉक्टर आणि  एका नर्सचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लष्करातील जे जवान अद्याप कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेले नाहीत, अशा सर्व जणांना तातडीने माघारी बोलविण्यात आले आहे. यासाठी बेंगळूर ते जम्मू आणि बेंगळूर ते गुवाहाटी अशा दोन स्वतंत्र रेल्वे सोडण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

देवभूमीतील अपशकुन, पंजाबात पराभवाचे डोहाळे

Patil_p

‘कोव्होव्हॅक्स’ला डब्ल्यूएचओची मंजुरी

Patil_p

भारतीय अर्थव्यवस्था लवकरच वेग घेईल !

Patil_p

राजस्थान : जयपूर विमानतळावर 14 प्रवाशांकडून 32 किलो सोने जप्त

Tousif Mujawar

विधान परिषद : राजू शेट्टी पुन्हा महाविकासआघाडी सोबत

Abhijeet Khandekar

मोदीजी, नोटांवरील गांधीजींचा फोटो हटवा; काँग्रेस आमदाराची मागणी

Archana Banage