Tarun Bharat

नौदलाच्या वरिष्ठ कमांडर्सची आजपासून तीन दिवसीय परिषद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

नौदलाच्या वरिष्ठ कमांडर्सची आजपासून तीन दिवसीय परिषद सुरू झाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज या परिषदेला संबोधित करणार आहेत. डिपार्टमेंट ऑफ मिलिट्री अफेअर्स (DMA) आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) पदाच्या निर्मितीनंतर नौदल कमांडर्सची ही पहिली परिषद आहे.

या बैठकीत नौदलाचे प्रमुख नौदलाचे संचलन, रसद, मानव संसाधन, प्रशिक्षण आणि प्रशासकीय कामांचा वर्षभरातील स्थितीचा आढावा घेणार आहेत. या परिषदेत हिंद महासागर आणि प्रशांत महासागरतील सुरक्षाविषयक मुख्य गरजा आणि नौदलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नौदलाच्या कार्यात्मक पुनर्रचनेबाबत चर्चा होईल. 

भारत-चीनमधील वाढता संघर्ष आणि कोरोनाच्या काळात निर्माण झालेली आव्हानात्मक परिस्थिती यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

Related Stories

सुधा भारद्वाज यांना ‘सर्वोच्च’कडून दिलासा

Amit Kulkarni

रतन टाटांनी पुन्हा जिंकली भारतीयांची मने

Patil_p

कोरोना लढ्यासाठी टिक टॉक कडून 100 कोटींची मदत

prashant_c

पाक सैन्याकडून पुंछ सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा

prashant_c

अनंतनागमध्ये 6 वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा

datta jadhav

स्तुती नको, स्वतःला बदला !

Patil_p