Tarun Bharat

नौदलाला मिळणार अत्याधुनिक क्रूझ क्षेपणास्त्र

वृत्तसंस्था / लखनौ :

चीन आणि पाकिस्तानच्या नौदलाचे वाढते बळ आणि सागरी धोका पाहता भारतीय नौदलासाठी एक नवे अत्याधुनिक क्रूझ क्षेपणास्त्र निर्मिले जात आहे. सुमारे 1 हजार किलोमीटर अंतरापर्यंत समुद्रामधून जमिनीवर हल्ला करण्यास सक्षम या क्षेपणास्त्राला ब्राह्मोसच्या प्रक्षेपकामधून डागता येणार आहे. या क्षेपणास्त्राच्या मारक पल्ल्यात पूर्ण पाकिस्तान आणि चीनचा भारताला लागून असलेला भाग असणार आहे. हे क्षेपणास्त्र स्वनातीत वेगाने उड्डाण करण्यास सक्षम असेल.

 नौदलाने अशाप्रकारच्या क्षेपणास्त्राची मागणी केल्यानेच डीआरडीओ याची निर्मिती करत आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये या प्रस्तावाला अनुमती मिळणार असून 2023 च्या प्रारंभी क्षेपणास्त्राची पहिली चाचणी होऊ शकते.

20 चाचण्या होणार

 क्षेपणास्त्राच्या निर्मितीचे काम डीआरडीओच्या बेंगळूर येथील प्रयोगशाळेला देण्यात आले आहे. याच प्रयोगशाळेने भारताचे पहिले स्वनातीत क्षेपणास्त्र निर्भयची निर्मिती केली होती. नव्या अत्याधुनिक क्षेपणास्त्राच्या 20 चाचण्या होणार असून याकरता पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. हे क्षेपणास्त्र अत्यंत कमी उंचीवर उड्डाण करत शत्रुवर वार करणार आहे.

रडारला चकवा

या क्षेपणास्त्राची हवाई तसेच पाणबुडी आवृत्तीही निर्माण केली जाणार आहे. क्षेपणास्त्रामुळे नौदलाला एक हजार किलोमीटर अंतरावरील शत्रूवर प्रहार करण्याची क्षमता प्राप्त होईल. हे क्षेपणास्त्र अत्यंत कमी उंचीवरून उडणार असून रडारला चकवा देण्यास यशस्वी ठरणार आहे.

Related Stories

देशात 59,118 रुग्णांची वाढ

datta jadhav

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 14 लाखांवर

datta jadhav

आजच्या चर्चेपूर्वी शेतकरी आक्रमक

Patil_p

पेट्रोल-डिझेल 6 ते 8 रूपयांनी होऊ शकते स्वस्त

Patil_p

पंजाब : मागील 24 तासात 581 नवे कोरोना रुग्ण ; 27 मृत्यू

Tousif Mujawar

आधार, शादी, डब्बा ऑक्सफर्ड डिक्शनरीत

Patil_p
error: Content is protected !!