Tarun Bharat

नौशेरा सेक्टरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद

ऑनलाईन टीम / नौशेरा :

जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत.

नौशेरा सेक्टर परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाने आज सकाळी शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान, सुरक्षा दलाने या परिसराला घेराव घातला. त्यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले. दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू असून, गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

Related Stories

‘हिंदू युवा वाहिनी’ उत्तर प्रदेशात पुन्हा सक्रीय

Patil_p

पंजाब : कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 74 हजार 838 वर

Tousif Mujawar

सचिन पायलटांसाठी भाजपचे दरवाजे मोकळे

Patil_p

निर्यात मार्चमध्ये 58 टक्क्यांनी वाढली

Patil_p

डाळींच्या खरेदीत वाढ करण्याचा निर्णय

Patil_p

भारतात कोरोनामुळे अजून वाईट स्थिती येईल; गुगलचे सुंदर पिचाईंचा इशारा

Archana Banage