Tarun Bharat

न्यायालयाच्या आवारात बेशिस्तपणे पार्किंग

Advertisements

जेएमएफसी न्यायालयाच्या प्रवेशव्दारावरच पार्किंग केल्याने समस्या

प्रतिनिधी /बेळगाव

कोरोनानंतर आता न्यायालये गजबजू लागली आहेत. न्यायालयांमध्ये गर्दी वाढली आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात अनेक इमारती बांधण्यात येत आहेत. त्यामुळे पार्किंगला जागा कमी पडत आहे. पार्किंगला जागा नसल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी चालक-मालक चक्क प्रवेशद्वारासमोरच वाहने पार्किंग करत आहेत. त्यामुळे ये-जा करणेही कठीण झाले आहे.

मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या परिसरातील अनेक न्यायालये जेएमएफसी न्यायालयाकडे हलविण्यात आली. त्यामुळे जेएमएफसी न्यायालयाच्या परिसरात पार्किंगची समस्या आता गंभीर बनत चालली आहे. न्यायालयाला जागा कमी पडू लागली आहे. त्याचबरोबर पार्किंगलाही जागा नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. दुचाकीस्वार आणि चारचाकीमालक जागा मिळेल त्या ठिकाणी पार्किंग करून जात आहेत. न्यायालयामध्ये नेहमीच वकिलांबरोबरच पक्षकारांचीही धावपळ असते. त्यामुळे घाईगडबडीत ही वाहने पार्किंग केली जात आहेत.

बेशिस्तपणे पार्किंग होत असल्यामुळे ये-जा करणाऱया वकिलांना आणि इतरांना त्याचा मोठा त्रास होत आहे. तेंव्हा या पार्किंगला शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे. लोकअदालतच्या इमरातीसमोरच आता आणखीन एक इमारत होत आहे. त्यामुळे पार्किंगसाठी जागाच नाही. तेंव्हा इमारती बांधण्यापेक्षा आहे त्या इमारतीमध्येच अधिक न्यायालये सुरू करून पार्किंगला जागा ठेवावी, अशी मागणी वकील वर्गातून होत आहे.

Related Stories

‘कलाश्री’ ग्रुपतर्फे किराणा सुपर मार्केटचा भव्य शुभारंभ

Patil_p

बेळगावप्रश्नी गृहमंत्र्यांना भेटणार

Amit Kulkarni

बेळगाव श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्टव स्पर्धा 26 रोजी

Amit Kulkarni

अखेर रिक्षाचालकांकडून गटारीची स्वच्छता

Amit Kulkarni

वाहतूक दक्षिण पोलिसांच्या कारभाराची चौकशी सुरू

Patil_p

शिमोगा घटनेच्या पार्श्वभूमीवर बेळगावातही खबरदारी

Amit Kulkarni
error: Content is protected !!