Tarun Bharat

न्यूझीलंडकडून बांगलादेशचा ‘व्हाईटवॉश’

Advertisements

वृत्तसंस्था / हॅमिल्टन

AUCKLAND, NEW ZEALAND – APRIL 01: Finn Allen of New Zealand watches his shot during game three of the International T20 series between New Zealand and Bangladesh at Eden Park on April 01, 2021 in Auckland, New Zealand. (Photo by Fiona Goodall/Getty Images)

यजमान न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. या मालिकेत बांगलादेशला ‘व्हाईटवॉश’ स्वीकारावा लागला. गुरूवारी पावसाचा अडथळा आलेल्या तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा 65 धावांनी पराभव केला. पावसामुळे हा सामना प्रत्येकी 10 षटकांचा खेळविला गेला. न्यूझीलंडच्या फिन ऍलेनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 10 षटकांत 4 बाद 141 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशचा डाव 9.3 षटकांत 76 धावांत आटोपला. न्यूझीलंड संघाचा 2021 च्या क्रिकेट हंगामातील मायदेशातील हा सलग सातवा मालिका विजय आहे.

न्यूझीलंड संघाच्या डावात ग्युप्टील आणि ऍलेन यांनी 5.4 षटकांत 85 धावा झोडपल्या. पहिल्या पाच षटकाअखेर न्यूझीलंडने बिनबाद 69 धावा जमविल्या होत्या. दोन जीवनदानाचा लाभ घेत ऍलेनने 29 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 71 धावा झोडपल्या. सलामीच्या ग्युप्टीलने 19 चेंडूत 5 षटकार आणि  1 चौकारांसह 44 धावा झळकविल्या. फिलीप्सने 6 चेंडूत 2 षटकारांसह 14, मिचेलने 6 चेंडूत 1 चौकारांसह 11 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 10 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे टी. अहमद, एस. इस्लाम आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्त्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशचा डाव 9.3 षटकांत 76 धावा आटोपला. बांगलादेशच्या एकाही फलंदाजांला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यांच्या तीन फलंदाजांनी  दुहेरी धावसंख्या गाठली. सलामीच्या नईमने 13 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह 19, एम. हुसेनने 8 चेंडूत 1 षटकारांसह 13 आणि सरकारने 4 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. एस. इस्लामने 1 षटकारांसह 10, अफताब हुसेनने 1 षटकारांसह 8 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 5 षटकार आणि 5 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे ऍसलने 13 धावांत 4 तर साऊदीने 15 धावांत 3, मिल्ने, फर्ग्युसन आणि फिलीप्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड 10 षटकांत 4 बाद 141 (ऍलेन 71, ग्युप्टील 44, फिलीप्स 14, मिचेल 11, टी. अहमद, एस. इस्लाम आणि मेहदी हसन प्रत्येकी एक बळी).

बांगलादेश 9.3 षटकांत सर्वबाद 76 (नईम 19, एम. हुसेन 13, सरकार 10, ऍसल 4-13, साऊदी 3-15, मिल्ने 1-24, फर्ग्युसन 1-13, फिलीप्स 1-11).

Related Stories

मँचेस्टर सिटी संघाचा पराभव

Patil_p

बोसने केली रोजंदारी कर्मचाऱयांची भेजनव्यवस्था

Patil_p

बॅटप्रमाणेच भालाही लोकप्रिय होईल – अनुराग ठाकुर

Patil_p

व्हिएतनामची भारतावर एकतर्फी मात

Patil_p

ऑस्ट्रेलियन पथकाचे मायदेशी आगमन

Patil_p

जोकोविच, अँड्रीस्क्यू चौथ्या फेरीत

Patil_p
error: Content is protected !!