Tarun Bharat

न्यूझीलंडचा अष्टपैलू अँडरसन निवृत्त

वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च

न्यूझीलंडचा अष्टपैलू कोरी अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. अलिकडच्या कालावधीत वारंवार दुखापतीमुळे अँडरसनला चांगलेच त्रासले होते. अँडरसनने वनडे क्रिकेटमध्ये जलद शतक नोंदविण्याचा विक्रम केला आहे. अँडरसनने अलिकडे अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट बरोबर तीन वर्षांचा करार केला आहे.

29 वर्षीय कोरी अँडरसनने 13 कसोटी, 49 वनडे आणि 31 टी-20 सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एकूण 93 सामने खेळले असून त्यामध्ये 2277 धावा जमविल्या आहेत. फलंदाजी करताना दोन शतके आणि 10 अर्धशतके नोंदविली असून त्याने गोलंदाजीत 90 बळी मिळविले आहेत. न्यूझीलंडतर्फे वनडे क्रिकेटमध्ये जलद शतक नोंदविणारा अँडरसन हा एकमेव फलंदाज आहे. 2013 साली विंडीजविरूद्धच्या वनडे सामन्यात अँडरसनने 36 चेंडूत शतक झळकविले होते.

तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या डिव्हीलीयर्सने विंडीजविरूद्ध वनडे सामन्यात 31 चेंडूत शतक ठोकले होते. आयपीएल स्पर्धेत अँडरसनने दिल्ली, मुंबई इंडियन्स आणि बेंगळूर संघांचे प्रतिनिधीत्व केले होते. 2015 साली आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱया न्यूझीलंड संघामध्ये अँडरसनचा समावेश होता. गेल्या ऑगस्टमध्ये कॅरेबियन प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेत अँडरसनने बार्बाडोस ट्रायडेंट्स संघाकडून आपला शेवटचा सामना खेळला होता.

Related Stories

खो-खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचा लंकेवर डावाने विजय

Patil_p

मोदींचा श्रीजेशला सवाल, पंजाबी शिकलास का?

Amit Kulkarni

सुवेद पारकरचे पदार्पणात शतक

Patil_p

फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी महिला संघ आधी पात्र ठरणार

Patil_p

भारतीय संघ 8 महिन्यांत मायदेशात 21 सामने खेळणार

Patil_p