Tarun Bharat

न्यूझीलंडचा नील वॅग्नर दुसऱया कसोटीतून बाहेर

Advertisements

वेलिंग्टन / वृत्तसंस्था

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅग्नर पाकिस्तानविरुद्ध होणाऱया दुसऱया कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. यापूर्वी, पहिल्या कसोटी सामन्यात खेळताना त्याला तळव्याची दुखापत झाली. न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील दुसरी कसोटी रविवारपासून ख्राईस्टचर्चमधील हॅग्ले-ओव्हल येथे खेळवली जाणार आहे.

वॅग्नरला पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दोन वेदनाशमक इंजेक्शन्स घ्यावी लागली. यजमान संघाने त्यात 101 धावांनी एकतर्फी विजय मिळवला होता. माऊंट माऊंगनुईमधील बे ओव्हलवरील लढतीत वॅग्नरला फलंदाजी करत असताना दुखापत झाली होती. पुढे उर्वरित तीन दिवसात त्याने काही मोठे स्पेल टाकले आणि सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडने शानदार विजय संपादन केला, त्यात त्याने शतकवीर फवाद आलम व धोकादायक ठरु पाहणाऱया फहीन अश्रफला बाद केले.

वॅग्नर आता किमान 6 आठवडे खेळू शकणार नसल्याचा अंदाज स्टीडने ख्राईस्टचर्च विमानतळावर बोलताना व्यक्त केला. दुखापतीशी झुंजत असताना, वेदनाशमक इंजेक्शन घेऊन आपली जबाबदारी चोख पार पाडणारे खूप कमी खेळाडू असतात, त्यात वॅग्नरचा आघाडीने समावेश होतो, असे स्टीडने पुढे नमूद केले. वॅग्नरच्या जागी आता मॅट हेन्रीची वर्णी लागेल, असे सध्याचे संकेत आहेत. मॅट हेन्री अलीकडेच हाताच्या दुखापतीतून सावरला आहे.

Related Stories

सांगलीत रणजी क्रिकेटचे सामने होणार!

Abhijeet Shinde

जपानचा केन्टो मोमोटा अपघातात जखमी

Patil_p

ऑस्ट्रियातील शर्यतीने फॉर्म्युला वन मोसमाची सुरुवात

Patil_p

बेशिस्त वर्तनाबद्दल मुश्फिकूर रहीमला दंड

Omkar B

द. आफ्रिका दौऱयाची हमी दिलेली नाही : बीसीसीआय

Patil_p

‘अश्विनास्त्रा’समोर कांगारुंची दाणादाण!

Patil_p
error: Content is protected !!