Tarun Bharat

न्यूझीलंडचा सलामीवीर गुप्टीलला दुखापत

वृत्त संस्था/ शारजा

न्यूझीलंडचा सलामीचा अनुभवी फलंदाज मार्टिन गुप्टील च्या अंगठय़ाला दुखापत झाल्याने येत्या रविवारी होणाऱया भारताविरूद्धच्या सामन्यात त्याच्या सहभागाविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या पाकविरूद्ध सामन्यात गुप्टीलला ही दुखापत झाली. पाकच्या हॅरीस रौफचा वेगवान चेंडू त्याच्या अंगठय़ावर आदळला. या सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभव पत्करावा लागला. गुप्टील ने या सामन्यात 20 चेंडूत 17 धावा जमविल्या. गुप्टील  चेंडू आदळल्यानंतर वेदनेने तळमळत होता, असे प्रमुख प्रशिक्षक स्टेड म्हणाले.

आगामी दोन दिवसांच्या कालावधीत ही दुखापत पूर्णपणे बरी झाली नाही तर त्याला भारताविरूद्ध खेळता येणार नाही. रविवारचा भारत आणि न्यूझीलंड हा सामना अस्तित्वाच्या दृष्टीने दोन्ही संघांना महत्त्वाचा आहे. त्यामुळे गप्टील खेळू शकत नसल्यास न्यूझीलंडला त्याची चांगलीच उणीव भासू शकेल. फर्ग्युसन दुखापतीमुळे यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर फेकला गेला असल्याने न्यूझीलंडसाठी चिंतेचे कारण आहे. गट-2 मध्ये पाक संघाने आपले दोन्ही सामने जिंकून गुणवारीत आघाडीचे स्थान मिळविले आहे. दुबईत रविवारी होणाऱया भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात विजय मिळविणाऱया संघाला उपांत्य फेरीत पोहोचणे तुलनेने अधिक सोपे ठरु शकते.

Related Stories

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर

Patil_p

भारतीय वरिष्ठ महिला हॉकी संघाचा पराभव

Patil_p

पीएसपीबीला बॅडमिंटनचे विजेतेपद

Amit Kulkarni

जेरेमीची ऑलिम्पिक संधी थोडक्यात हुकली

Patil_p

नीरज चोप्राने रचला नवा इतिहास!

Patil_p

तामिळ थलैवाज-यू मुम्बा रोमांचक लढत टाय

Patil_p