Tarun Bharat

न्यूझीलंडच्या संसदेत गदारोळ

Advertisements

टाय न घातल्याने आदिवासी खासदाराला सभागृहाबाहेर काढले

वृत्तसंस्था /  ऑकलंड

न्यूझीलंडच्या संसदेचे सभापती ट्रेवर मलार्ड यांनी आदिवासी खासदार राविरी वेइटिटि यांना सभागृहातून बाहेर काढले आहे. टाय न घालता सरकारला प्रश्न विचारल्याने राविरी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. सरकारच्या कुठल्याही मंत्र्याला प्रश्न विचारू इच्छित असल्यास नियमांनुसार टाय परिधान करावा लागणार असल्याचे सभापतींनी काही दिवसांपूर्वी राविरी यांना सांगितले हेते.

राविरी हे माओरी आदिवासी समुदायाशी संबंधित आहेत. सभागृहात या समुदायाचे एक लॉकेट घालून ते आले होते. सभापतींनी स्वतःच्या दालनात त्यांना बोलावून समजाविले होते, पण राविरी यांनी त्यांच्या सूचना मानण्याची तयारी दर्शविली नव्हती.

गुलामगिरीच्या निशाणीस नकार

आम्हा आदिवासी लोकांना स्वतःच्या परंपरांवर प्रेम आहे. आम्ही हेच लॉकेट (टँगा) परिधान करू. गुलामीचे प्रतीक परिधान करण्यावर आक्षेप असल्याचे राविरी यांनी संसदेतून बाहेर काढण्यात आल्यावर म्हटले आहे. मंगळवारी संसदेत प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना राविरी यांनी एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता सभापती मलार्ड यांनी त्यांना रोखले. टाय परिधान केलेला खासदारच प्रश्न विचारू शकतो असे सभापतींनी त्यांना सुनावले. या प्रकारानंतर दोघांमध्येही शाब्दिक चकमक झडली. मलार्ड यांनी माओरी समुदायाच्या या खासदाराला सभागृहात बाहेर काढण्याची कारवाई केली आहे.

राविरींसोबत दुसऱयांदा प्रकार

मागील वर्षी संसदीय अधिवेशनादरम्यान सभापतींनी राविरी यांना नियमांचे पालन करण्याचा इशारा दिला होता. टाय परिधान करण्याचा नियम जुना झाला आहे. मी जे घातले आहे, ते माझ्या आणि न्यूझीलंडच्या अनेक लोकांसाठी टायच आहे. या सभागृहात मेक्सिकन वंशाचा एक खासदार असून तो स्वतःचा पारंपरिक टाय परिधान करतो, त्यावर आक्षेप नाही, मग आदिवासींना का रोखले जाते असा सवाल राविरी यांनी उपस्थित केला आहे.

माओरी समुदाय

मार्च 2020 च्या जनगणनेनुसार न्यूझीलंडची लोकसंख्या सुमारे 50 लाख आहे. देशात अनेक आदिवासी समुदाय असून यात माओरींचाही समावेश आहे. हा समुदाय मूळचा पोलंडचा असल्याचे मानले जाते. या समुदायाची लोकसंख्या 7 लाख 75 हजार 836 इतकी आहे. 2013-2020 या कालावधीत यांचे प्रमाण सुमारे 1.8 टक्क्यांनी वाढले आहे.

Related Stories

चीनमध्ये कोरोनाची नवी लाट

Patil_p

ब्रिटनमधील लॉक डाऊन 1 जून पर्यंत वाढवला

Tousif Mujawar

पाय नसतानाही बास्केटबॉलच्या टीममध्ये सामील

Patil_p

घानाच्या संसदेत चपलांनी हाणामारी

Amit Kulkarni

अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात होण्याऱ्या उपासमारीला रोखा: UN प्रमुख

Archana Banage

पाकिस्तानी सैन्यप्रमुखांनी आळवला शांततेचा सूर

Patil_p
error: Content is protected !!