Tarun Bharat

न्यूझीलंड : अनैतिक संबंधाच्या कारणावरून मंत्र्याची हकालपट्टी

ऑनलाईन टीम / वेलिंग्टन : 

महिला कर्मचाऱ्याशी अनैतिक संबंध ठेवल्याचा कारणावरून न्यूझीलंडमध्ये एका मंत्र्याची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी ही कारवाई केली. 

इयान लीस-गॅलोवे असे मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेल्या मंत्र्याचे नाव आहे. ते अर्डर्न यांच्या मंत्रिमंडळात होते.लीस-गॅलोवे यांच्या अखत्यारीत असलेल्या एका विभागात संबंधित महिला कार्यरत होती. त्यानंतर तिची नेमणूक या मंत्र्याच्या कार्यालयात करण्यात आली होती. लीस-गॅलोवे यांचे एका महिलेसोबत जवळपास एक वर्षापासून संबंध होते. त्यांनी या कृत्याबाबत माफी मागितली होती. मात्र, पंतप्रधान अर्डर्न यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत लीस-गॅलोवे यांच्यावर कारवाई केली.

लीस-गॅलोवे यांनीही आपल्या कृत्याची कबुली देऊन, माफी मागितली. तसेच मंत्री पदावर असताना आपण चुकीचे काम केले असून, पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

कोविड महामारीनंतर बदलला मेन्यू

Patil_p

क्विंटन डी कॉकने या कारणासाठी सामना सोडला

Archana Banage

भारत आणि चीन : दोन झोपाळू देश

Patil_p

भारत मोठी बाजारपेठ असल्याने जगाची डोळेझाक

Patil_p

ब्रह्मांडातील कृष्णविवरांचा नकाशा तयार

Patil_p

अंतराळातून नियंत्रित शस्त्राद्वारे इराणच्या अणुशास्त्रज्ञाची हत्या

Patil_p