Tarun Bharat

न्यूझीलंड इलेव्हन संघात रॉस टेलरचा समावेश

वृत्तसंस्था/ नेपियर

हॉलंडचा क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱयावर येणार आहे. या दौऱयात उभय संघात वनडे मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेपूर्वी नेपियरमध्ये पुढील आठवडय़ात न्यूझीलंड इलेव्हन आणि हॉलंड यांच्यात सरावाचा सामना खेळविला जाणार असून न्यूझीलंडचा माजी कसोटीवीर रॉस टेलर सहभागी होणार आहे.

रॉस टेलरने यापूर्वीच क्रिकेट क्षेत्रातून निवृत्ती पत्करली होती. चालू महिन्याच्या अखेरीस न्यूझीलंड आणि हॉलंड यांच्यात ही वनडे मालिका होणार आहे. न्यूझीलंड इलेव्हन आणि हॉलंड यांच्यातील हा सरावाचा सामना 19 मार्चला खेळविला जाणार आहे. त्याचप्रमाणे उभय संघात एकमेव टी-20 सामना आयोजित केला आहे. न्यूझीलंड इलेव्हन संघाचे नेतृत्व ब्रेसवेलकडे सोपविण्यात आले आहे.

Related Stories

वर्षअखेरीस भारतात आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप

Patil_p

टोकियो ऑलिंपिकला जाणाऱया भारताच्या पाच ऍथलीट्सचे लसीकरण लवकरच

Patil_p

सायनाला पराभवाचा धक्का, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

द.आफ्रिकेची मालिकेत विजयी आघाडी

Patil_p

विजय हजारे करंडक बाद फेरीचे आठ सामने दिल्लीत?

Patil_p

कॅसेटकीनाचा पराभव

Patil_p