Tarun Bharat

न्यूझीलंड संघात मॅट हेन्रीचा समावेश

Advertisements

वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च

आगामी बांगलादेश दौऱयासाठी घोषित करण्यात आलेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघामध्ये शेवटच्या क्षणी फलंदाज ऍलनच्या जागी वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीचा समावेश करण्यात आल्याची माहिती क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने दिली.

न्यूझीलंडचा फलंदाज ऍलन याला कोरोनाची बाधा झाली होती. सध्या तो क्वॉरंटाईनमध्ये असल्याने तो या दौऱयासाठी उपलब्ध राहण्याची शक्यता कमी असल्याने त्याच्या जागी वेगवान गोलंदाज मॅट हेन्री याला संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र या दौऱयासाठी ऍलनचा न्यूझीलंड संघात समावेश राहिल पण डॉक्टरांच्या निर्णयानंतरच त्याला या दौऱयावर घेऊन जाण्यासंदर्भात विचार केला जाईल, असे क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने सांगितले. न्यूझीलंडचा संघ सोमवारी ढाका येथे दाखल होणार आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्याची टी-20 मालिका 1 सप्टेंबरपासून सुरू होईल.

Related Stories

गुजरात जायंटस्मध्ये गेलचे आगमन

Patil_p

वनडे मालिकेत अफगाणची विजयी सलामी

Patil_p

‘रुट’च्या शतकामुळे इंग्लंडचा ‘पाया’ मजबूत!

Patil_p

लक्ष्य सेन, श्रीकांत यांचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त

Patil_p

यशस्वी जैस्वालच्या शतकाने मुंबईचा डाव सावरला

Patil_p

अमेरिकन टेनिस स्पर्धेतून किर्गिओसची माघार

Patil_p
error: Content is protected !!