Tarun Bharat

न्यूयॉर्क : ब्रॉन्क्स प्राणी संग्रहालयातील वाघिणीला कोरोनाची लागण

ऑनलाईन टीम / अमेरिका :

संपूर्ण जगात थैमान घालत असलेला कोरोना व्हायासर ने आता प्राण्यांवर ही घाला घालण्यास सुरुवात केली आहे. न्यूयॉर्कमधील एका प्राणी संग्रहालयातील वाघिणीला कोरोनाची लागण झाली आहे. एखाद्या प्राण्याला कोरोनाची लागण झाल्याची पहिलीच घटना आहे. 

अमेरिकेचे कृषी विभाग राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेने दिलेल्या माहितीनुसार, ब्रॉन्क्स प्राणी संग्रहालयातील एका कर्मचाऱ्यांमुळे चार महिन्याच्या वाघिणीला कोरोनाची लागण झाली आहे. प्राण्यांची देखभाल करण्याची जबाबदारी असणाऱ्या या कर्मचाऱ्याला नुकतीच कोरोनाची लागण झाली होती.

दरम्यान, 16 मार्च पासून हे प्राणी संग्रहालय पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र, प्राणी संग्रहालयातील पाच वाघ आणि पाच सिंहांमध्ये कोरोनाची लक्षण आढळल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून लवकरच त्यांची प्रकृती सुधारेल असे प्राणी संग्रहालया कडून सांगण्यात आले आहे. 

तसेच कोरोनाची लागण झालेल्या सर्वांना जोपर्यंत पूर्ण माहिती उपलब्ध होत नाही तो पर्यंत प्राण्यांच्या संपर्कात येऊ नये असा सल्ला पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेकडून देण्यात आला आहे. 

Related Stories

मुलांसोबत रानोमाळ भटकणारे दांपत्य

Patil_p

‘म्हैसूर’ येथे योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात पंतप्रधानांचा सहभाग

Rohit Salunke

पाकिस्तानमध्ये 40 टक्के वैमानिकांकडे बोगस परवाने

datta jadhav

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला मुंबईत अटक

datta jadhav

कोल्हापूर -पुणे मार्गावर एसटीच्या फेऱ्या वाढल्या

Archana Banage

SBI चा रशियाला दणका; प्रतिबंधित संस्थांची केली आर्थिक कोंडी

datta jadhav