Tarun Bharat

न्यूयॉर्कमध्ये दोन मांजरींना कोरोनाची लागण

ऑनलाईन टीम /  न्यूयॉर्क :

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली होती. मात्र, आता वाघिणी ची मावशी समजल्या जाणाऱ्या मांजरीला ही  कोरोनाची लागण झाल्याची माहिती येत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील दोन मांजरींना कोरोनाची बाधा झाली आहे. या मांजरी न्यूयॉर्क मधील वेगवेगळ्या भागातील असून दोघांना श्वसनाच्या आजारामुळे पशुवैद्याकडे नेण्यात आले होते. त्यावेळी उपचारा दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दोघांवरही उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 


पहिली मांजर ज्या घरातून आली त्या घरातील कोणालाही कोरोनाची लक्षणे नव्हती. मात्र, दुसऱ्या मांजरीच्या घरातील मालकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. 


दरम्यान, या दोन्ही मांजरींना न्यूयॉर्क मधील प्राणी संग्रहालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

Related Stories

ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये सार्वजनिक उत्सवांवर बंदी

Archana Banage

13 वर्षीय मुलीला बलात्कारामुळे मातृत्व

Patil_p

इसाक हर्जोग इस्रायलचे नवे राष्ट्रपती

Patil_p

पीओके आणण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी काश्मीरींना वाचवावं – संजय राऊत

Archana Banage

अमेरिकेच्या सैनिकांवर हल्ल्याचा चीनचा कट

Patil_p

कोल्हापूर : घटस्थापनेच्या दिवशीच पुजाऱ्यावर काळाचा घाला

Archana Banage