Tarun Bharat

पंकजा मुंडे बंडाचा विचार कधीच करणार नाहीत – चंद्रकांत पाटील


मुंबई \ ऑनलाईन टीम

केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. मात्र तरी समर्थकांच्या राजीनाम्यांमुळे अद्यापही पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चा सुरुच आहे. या सगळ्या प्रकरणावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे कधीच बंड करणार नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपसाठी गोपीनाथ मुंडे यांनी अनेक संघर्ष केले आणि भाजपला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख दिली. अशा घरात पंकजा मुंडे जन्मल्या आहेत त्यामुळे त्या बंडाचा विचार करणार नाही, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, जर एखादी गोष्ट घडली आणि ती आवडली नसल्यास कार्यकर्त्यांना आपली भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळावं असे कार्यकर्त्यांचे मत होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक विचार करुन या मंत्र्यांना निवडले आहे. यामुळे लोकांच्या ध्यानीमनी नव्हतं अशा लोकांना संधी देण्यात आली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांना भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. परंतु पंकजा मुंडे यांनी त्यांना सांगितले की, कोणीच राजीनामे द्यायचे नाही. आपल्या घरातून आपण निघायचं नाही असे कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. पंकजा मुंडेंवर दुःखाचे डोंगर कोसळले असताना त्यांनी समजदारपणाचे टोक दाखवलं असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात २८ जणांना जोडायचं होते त्यात १२ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे ४० जणांना घ्यायचे होते यामध्ये आपला देश मोठा आहे यामुळे एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होणारच असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Related Stories

महाराष्ट्रात गुरुवारपासून पाऊस वाढणार

datta jadhav

कांद्यावरची निर्यात बंदी हटाव:काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव

Patil_p

गडकिल्ल्यांवर दारू पाटर्य़ा, गोंधळ घातल्यास 6 महिन्यांचा कारावास

prashant_c

”रेमडेसीवीर खरेदी प्रकरणी फडणवीसांची चौकशी झाली पाहिजे”

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात सशर्त अनलॉक; आज नियमावली होणार जाहीर

Archana Banage

साताऱयातील तेराशे कामगारांसह रेल्वे रवाना

Patil_p
error: Content is protected !!