Tarun Bharat

पंकज अडवाणी बाद फेरीत दाखल

वृत्तसंस्था/ अँटेलिया (तुर्की)

येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या विश्व स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नूकरपटू पंकज अडवाणीने बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.

या स्पर्धेत पंकज अडवाणीने आपल्या गटातील प्राथमिक फेरीत सर्व सामने जिंकले आहेत. क गटात त्याचा समावेश आहे. या गटातील पहिल्या सामन्यात अडवाणीने तुर्कीच्या वाय. अब्दुररेहमानचा 3-0 अशा प्रेम्समध्ये (62-2, 117-8, 75-15) असा पराभव केला. या लढतीमध्ये पंकजने दुसऱया पेममध्ये शतकी ब्रेक नोंदवली. दुसऱया सामन्यात पंकज अडवाणीने इजिप्तच्या अहमद समीरवर 3-0 अशा प्रेम्समध्ये मात केली. तिसऱया सामन्यात अडवाणीने नेदरलँडस्च्या मार्को रिजेर्सचा 3-0 अशा प्रेम्समध्ये एकतर्फी पराभव केला. गेल्या महिन्यात कौलालंपूर येथे झालेल्या बिलियर्डस् स्पर्धेत पंकज अडवाणीने आपल्या देशाच्या सौरभ कोठारीचा पराभव करून विजतेपद पटकाविले होते. पंकजने आपल्या वैयक्तिक कारकीर्दीत 25 वेळा विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकल्या आहेत.

Related Stories

भारताच्या मार्गात रुट-बेअरस्टोचा अडसर!

Patil_p

बंगाल वॉरियर्स-तामिळ थलैवाज सामना टाय

Amit Kulkarni

जोकोविच, शापोव्हॅलोव्ह, बार्टी, अँड्रीस्क्यू दुसऱया फेरीत,

Patil_p

शरथ कमल, मुखर्जी ऑलिम्पिकसाठी पात्र

Patil_p

रणजी स्पर्धेतील उपांत्यपूर्व लढती आजपासून

Patil_p

बार्सिलोनाकडे स्पॅनिश सुपर चषक

Patil_p