Tarun Bharat

पंखे चोरणाऱयाला अटक

प्रतिनिधी / बेळगाव

वर्धाप्पा गल्ली येथील सरकारी मुलींची शाळा क्रमांक 3 येथील पंखे चोरल्याच्या आरोपावरून शहापूर पोलिसांनी त्याच गल्लीतील एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याजवळून चोरलेले 5 पंखे जप्त केले आहेत.

अमर संजय हजेरी (वय 22, रा. वर्धाप्पा गल्ली-खासबाग) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. आय. सनदी, एस. एम. कांबळे, एच. वाय. विभुती व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

30 मे 2021 रोजी वर्धाप्पा गल्ली येथील सरकारी मुलींच्या शाळेतून पंखे चोरण्यात आले होते. याप्रकरणी दयानंद शंकर पाटील यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. बुधवारी पंखे चोरणाऱया तरुणाला अटक करून त्याच्याजवळून 5 पंखे जप्त करण्यात आले आहेत.

Related Stories

बांगला देशात हिंदूंची अवस्था दयनीय

Patil_p

काँग्रेस नेते सिद्धरामय्या बेंगळूर रुग्णालयात दाखल

Archana Banage

उत्तरप्रदेशात आज मतदानाचा पहिला टप्पा

Patil_p

मृतदेहांचे विसर्जन गंगेत नको

Patil_p

भाजपा प्रवक्ते पदी मुन्ना कुरणे यांची निवड

Archana Banage

सांगली : ऊस हंगामाची सांगता ; शेतकऱ्यांना कोट्यावधीचा फटका

Archana Banage