Tarun Bharat

पंख्याला लटकून आत्महत्या आता अशक्य!

Advertisements

दरवषी भारतात पंख्याला लटकून फाशी घेऊन आत्महत्या करण्याच्या घटना बऱयाच घडतात. पण उत्तर प्रदेशातील एका प्राध्यापकाने यावर प्रभावी उपाय शोधला आहे. त्याने पंख्यासाठी असा रॉड बनविला आहे की ज्याला लटकल्यास पंखा खाली येतो. त्यामुळे त्याला लटकून फाशी घेता येत नाही.

नोयडा येथील आयटीएस महाविद्यालयाचे प्राध्यापक महिपसिंग यांनी हा ‘स्मार्ट रॉड’ दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर तयार केला आहे. या रॉडला चाळीस किलो किंवा त्यापेक्षा अधिक वजन लटकल्यास तो सरळ खाली येऊन जमिनीला टेकतो. त्यामुळे फासावर लटकणे अशक्मय होते. फॅन तयार करणाऱया कंपन्यांनी छताला फॅन लावण्यासाठी या रॉडचा उपयोग केल्यास आत्महत्येची एकही घटना घडू शकणार नाही, असे या प्राध्यापकांचे प्रतिपादन आहे. दरवषी जगात साधारणतः 8 लाख लोक आत्महत्या करतात. यापैकी भारताची संख्या 1 लाखाहून थोडी अधिक आहे. यापैकी 30 टक्के म्हणजे 30 हजारहून अधिक लोक पंख्याला लटकून आत्महत्या करतात. प्राध्यापकांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये पंख्याला लटकण्याचे प्रमाण बरेच अधिक आहे. या रॉडचा उपयोग केल्यास ही शक्मयता पूर्णतः नाहीशी होते. या रॉडचे वैशिष्टय़ असे की, फॅन कितीही जोरात फिरला तरी रॉड खाली येत नाही. तथापि, विशिष्ट वजनाच्या वर वजन लटकल्यास तो हळूहळू खाली येतो. त्यामुळे लटकलेली व्यक्ती जमिनीवर एकदम आपटून जखमही होत नाही. या रॉडबद्दल सध्या बरीच चर्चा केली जात आहे.

Related Stories

नौदलाला मिळणार कवरत्ती युद्धनौका

Patil_p

‘पराली’ पासून बनविली वीट

Amit Kulkarni

भारताला लवकरच मिळणार एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली

datta jadhav

इस्रायलचा ‘आत्मनिर्भर भारत’ला पाठिंबा

Omkar B

देशात हिंदूंचेच सर्वाधिक धर्मांतर

Patil_p

पुष्कर सिंह धामी आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

datta jadhav
error: Content is protected !!