Tarun Bharat

पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव कमिटीतर्फे तरुणांचा सत्कार

प्रतिनिधी /बेळगाव

पिरनवाडी बेळगाव येथे सुरू असलेल्या पंचकल्याण पुजेमध्ये तीर्थंकर भगवानांचे पंचकल्याण करण्यासाठी धर्मनगर मजले, जिल्हा कोल्हापूर येथून 20 ते 25 युवक सायकलवरून मूर्ती पाठीवर घेऊन पुजेसाठी हजर झाले. आचार्य धर्मसेन मुनी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि पावन सानिध्यात सुरू असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आणि मूर्तीचे पंचकल्याण करण्यासाठी या युवकांनी 150 कि.मी. सायकलचा प्रवास केला. तोही मूर्ती पाठीवर घेऊन. तीर्थंकर महावीर यांच्या दोन मूर्ती आणि धर्मनाथ भगवानांची एक मूर्ती अशा तीन मूर्ती पाठीवर घेऊन या तरुणांनी धर्म प्रभावना आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी प्रवास केला.

बेळगाव येथे पोहोचल्यानंतर पंचकल्याण कमिटीने या युवकांचे जल्लोषी स्वागत केले. आचार्य धर्मसेन आणि परमपूज्य वृषभ सेन महाराज यांचे आशीर्वचन घेऊन या मूर्तींचे पंचकल्याण करण्यासाठी पंच कमिटीकडे सुपूर्द केल्या गेल्या. यावेळी पंचकल्याण कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी युवकांचा सत्कार करण्यात आला. आचार्य धर्मसेन महाराज यांनी आशीर्वचनात केले. यावेळी वृषसेन महाराज यांचेही प्रवचन झाले.

Related Stories

शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट

Amit Kulkarni

चोर्‍या, घरफोडय़ांच्या सत्राने नागरिक हैराण

Patil_p

उचगाव येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

Omkar B

कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या वाढतीच

Amit Kulkarni

विवाहितेवर हल्ला तर मुलाचा गळा चिरून खून..!

Rohit Salunke

तिसरे रेल्वेगेट तीन दिवसांनंतर खुले

Amit Kulkarni