Tarun Bharat

पंचकल्याण महामहोत्सवात एकात्मतेचे दर्शन

पिरनवाडीत पार पडलेल्या सोहळय़ात जैन बांधवांमध्ये उत्साह : 108 मंगल कलशांनी नेमिनाथ तीर्थंकर मूर्तीला अभिषेक : हजारो भाविकांची उपस्थिती

वार्ताहर /किणये

पिरनवाडी (चिन्नपट्टण) येथे पंचकल्याण प्रति÷ा महामहोत्सव उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पाच दिवस सुरू असलेल्या महोत्सवाची बुधवारी सांगता झाली. पिरनवाडीसह पंचक्रोशीतील भाविकांनी महामहोत्सवात मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. शेकडो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.

दि. 2 पासून पंचकल्याण प्रति÷ा महामहोत्सवाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी यजमान आगमन व आचार्य निमंत्रण कार्यक्रम झाले. कित्येक वर्षांनंतर गावात पंचकल्याण प्रति÷ा महामहोत्सव असल्याने जैन बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या सोहळय़ात इतर समाजाचे लोकही सहभागी झाले होते. या सोहळय़ाच्या माध्यमातून गावात एकात्मतेचे दर्शन दिसून आले.

दुसऱया दिवशी इंद्र-इंदायणी आगमन, पूजा, इंद्रप्रति÷ा, कंकण बंधन, पंचामृत अभिषेक आदी कार्यक्रम झाले. तिसऱया दिवशी दीक्षा कल्याण, मुंजी बंधन व इतर विधी झाले. मंगळवारी केवलज्ञान कल्याण पूजनानंतर गावात आकर्षक रथ मिरवणूक झाली. याचबरोबर हत्ती व अश्वांचा सहभाग होता.

मिरवणुकीने डोळय़ांचे पारणे फिटल

मिरवणुकीत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱया लोककलेचे दर्शन घडविणाऱया वेशभूषा कलाकारांनी परिधान केल्या होत्या. डोळय़ांचे पारणे फेडणाऱया मिरवणुकीत परंपरागत वाद्यांसह ढोल-ताशांचा गजर झाला. ठिकठिकाणी मिरवणुकीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात येत होते.

 जैनबस्तीत  मूर्ती प्रति÷ापित

आचार्य श्री 1008 श्री धर्मसेन मुनी महाराज, श्री 108 श्री वृषभसागर महाराज, परमपूज्य जिनसेन भट्टारक महास्वामी आदींच्या मार्गदर्शनाखाली हा महामहोत्सव करण्यात आला. बुधवारी या महामहोत्सवाची सांगता झाली. यानिमित्त सकाळी नित्यपूजा करण्यात आली. दुपारी नेमिनाथ तीर्थंकर मूर्तीला अभिषेक करण्यात आला. गावातील महिला 108 मंगल कलश घेऊन उपस्थित होत्या. या मंगल कलशांची स्वामीजींच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. मूर्तीची प्रति÷ापना जैनबस्ती येथे करण्यात आली.

पाच दिवसांच्या या महोत्सवासाठी पिरनवाडीतील आमराईच्या बाजूला भव्य मंडप उभारला होता. ठिकठिकाणी या महामहोत्सवाचे स्वागत फलक लावले होते. गल्ल्यांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पाच दिवस भाविकांसाठी दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले होते. बुधवारी सांगता सोहळय़ानिमित्त पुरुषांसह महिलावर्ग भजनात तल्लीन झाला होता.

अनिल पाटील, महावीर पाटील, भूषण पाटील, सुप्रीत संगमी, मल्लेशी पाटील, धर्मू अनगोळकर, महावीर अनगोळकर, अजित पाटील, भरमाप्पा पाटील, अमित पाटील, बाहुबली संगमी, दिलीप हंचिनदमरे आदींसह इतर कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. 

Related Stories

शहरातील सिग्नल पुन्हा कार्यरत

Amit Kulkarni

मण्णूर गायरान जमिनीत अतिक्रमण

Amit Kulkarni

शिवाजीनगरचे समुदाय भवन विठुरायाच्या गजराने दुमदुमले

Patil_p

आरक्षण धोरण स्पष्टतेनंतर महापौर-उपमहापौर निवड

Amit Kulkarni

वडगाव परिसरात ड्रेनेजवाहिन्या तुंबल्या

Amit Kulkarni

दोन ठिकाणी मटका अड्डय़ांवर छापे; 26 अटकेत

Amit Kulkarni