Tarun Bharat

पंचगंगेकाठी जयंती नाल्यात मगर..!

स्मशानघाटापासून शंभर फुटांवर मगर, पुर्ण वाढ झालेल्या मगरीसह पिल्लाचे दर्शन

प्रतिनिधी/कोल्हापूर

पंचगंगेसह जयंती नाला दुषीत पाण्यामुळे चर्चेत असतो, पण गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा पात्रासह जयंती नाल्यातही मगरीचे दर्शन घडत आहे. आज, सोमवारी सकाळी जयंती नाल्याच्या काठावर मगर दिसून आली. गर्दी होताच ती पुन्हा पाण्यात गेली. मगरीसह तिचे पिल्लेही काहींनी पाहिले आहे. दरम्यान, वन विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली.

प्रयाग ते पंचंगगा घाटादरम्यान, काही दिवसांपुवी मगरीचे दर्शन झाले होते. त्यानंतर महापालिका अग्निशमन दल, वन विभागाने काही महिन्यांपुर्वी एका मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले होते. त्यानंतर पंचगंगा घाटावरील मगरीची भीती काहीशी कमी झाली होती. कृष्णा, वारणा नदी खोऱयांत नदीपात्रात मगरींची संख्या जास्त आहे. त्या ठिकाणी मगरीच्या हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत. वन विभागाच्यावतीने हा परिसर मगर प्रवण क्षेत्र घोषीतही करण्यात आला आहे. तेथील स्थानिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती केली आहे.

पंचंगगा स्मशानभुमीच्या पलीकडे स्मशान, केशवपन घाट आहे. त्याला म्हैशी धुण्याचा घाट म्हणूनही ओळखले जाते. या घाटापासून 50 फुट उत्तरेला जयंती नाला पंचगंगेला मिळतो. अन् याच परिसरात मगरीचा वावर आहे. ओढÎाच्या पलीकडे निकमांचे शेत आहे. तेथे गुऱहाळघरही आहे. हा भाग उंच, खोलगट आहे. त्यामुळे मगरीचे दर्शन सहजासहजी होत नाही. याच खोलगट भागात लाकूड, कचऱयामध्ये मगर बसली होती. ही मगर पुर्ण वाढ झालेली आहे. तिची लांबी 8 ते 10 फुट आहे. ब्रम्हपुरी टेकडी शेजारील नाल्याच्या अलीकडून ती सहजपणे दिसून येत आहे. हा भाग सपाट, गवताळ असल्याने मगरीचा धोका वाढला आहे.

दरम्यान सकाळी गवत कापण्यासाठी गेलेल्या काही जणांना जयंती नाल्यात मगर दिसून आली. त्यामुळे त्यांनी गवत कापणे बंद केले. सकाळी 11 च्या सुमारास ही मगर पाण्यातून बाहेर आली. अन् लाकडावर जाऊन बसली. मगरीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होताच मगरीला पाहण्यासाठी गर्दी झाली. गोंगाटामुळे साडेअकराच्या सुमारास मगरीने पुन्हा पाण्यात उडी घेतली. मगर पंचगंगा नदीकडे गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. वन विभागाचे चार कर्मचारी या मगरीचा शोध घेत आहेत.

Related Stories

इचलकरंजीतील उत्तम चौगुले खुनाचा छडा लावण्यात यश

Archana Banage

जिवंत अर्भक आढळल्याने खळबळ

Archana Banage

ईएसबीसी आरक्षणातील नियुक्त्या कायम

Archana Banage

कोल्हापूर : नवीन 19 कोविड केअर सेंटरची उभारणी

Archana Banage

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्यावर

Archana Banage

केकतवाडी गावास 35 लाख 80 हजार पेयजल योजनेतून मंजूर

Archana Banage