Tarun Bharat

पंचमसाली समाजाचा प्रवर्ग-2 मध्ये समावेश करा

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन

प्रतिनिधी / बेळगाव

लिंगायत पंचमसाली समाजाचा प्रवर्ग-2 मध्ये समावेश करावा, या मागणीसाठी लिंगायत पंचमसाली समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. पंचमसाली हा समाज बेळगाव जिल्हय़ामध्ये मोठय़ा संख्येने आहे. त्या समाजाला कोणत्याच सुविधा नाहीत. त्यामुळे या समाजातील सर्वसामान्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा तातडीने प्रवर्ग-2 मध्ये समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली.

लिंगायत पंचमसाली समाज हा आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीयदृष्टय़ा मागासलेला आहे. इतर समाजांना विविध सुविधा दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये कोणत्याच सवलती नाहीत. त्यामुळे अनेक जण शिक्षणामध्ये प्रगती करूनही मागासलेले आहेत. तेव्हा तातडीने या समाजाचा प्रवर्ग-2 मध्ये समावेश करणे गरजेचे आहे. यापूर्वी अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आता तातडीने निर्णय घ्यावा आणि समाजाला सुविधा उपलब्ध कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी समाजाचे जिल्हाध्यक्ष रुद्रण्णा चंदरगी, ज्ये÷ वकील ए. आर. पाटील, ऍड. आर. सी. पाटील, ऍड. शिवपुत्र फटकळ, ऍड. हणमंत कोंगाली, विनय नावलगट्टी, शिवनगौडा पाटील, डॉ. रवी पाटील, बसव सेना जिल्हा अध्यक्ष सुरेश किराई, ऍड. गिरीश पाटील, ऍड. आर. पी. पाटील यांच्यासह समाजातील नागरिक उपस्थित होते. 

Related Stories

नाटय़मय घडामोडीनंतर गाळय़ांसाठी लागली बोली

Patil_p

भाडय़ाच्या रक्कमेमुळे नागरिकांची बोलतीच बंद

Patil_p

सुस्थितीतील रस्त्याचेच डांबरीकरण!

Amit Kulkarni

पॉलिटेक्निक परीक्षा रद्द कराव्यात

Amit Kulkarni

कर्नाटकात धोका वाढला : २४ तासात ६१२८ पॉझिटिव्ह तर ८३ जणांचा मृत्यू

Archana Banage

बिजगर्णी, बेळवट्टीत ग्रामविकास आघाडीची बाजी

Omkar B