Tarun Bharat

पंचायतींची पाटी अद्याप कोरीच

पाच पालिकांसाठी तीन दिवसांत 58 अर्ज

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील पाच पालिकांच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या पारडय़ात तिसऱया दिवशी 22 अर्जांची भर पडत एकूण संख्या 58 वर पोहोचली आहे. दुसऱया बाजूने याच दरम्यान होणाऱया दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी एकही इच्छुक पुढे आलेला नसल्याने पंचायतीची पाटी कोरीच राहिली आहे.

दि. 23 एप्रिल रोजी राज्यातील म्हापसा, मडगाव, मुरगाव, सांगे आणि केपे या पाच पालिका आणि सर्वण कारापूर व वेळ्ळी या दोन ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एका प्रभागासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 31 मार्च पासून प्रारंभ झाली आहे. त्यात पालिकांसाठी पहिल्या दिवशी 10 अर्ज दाखल झाले होते. दुसऱया दिवशी त्यात 26 अर्जांची भर पडली व काल दि. 3 एप्रिल रोजी आणखी 22 जणांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे एकूण अर्जसंख्या 58 एवढी झाली. मात्र दोन पंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी अद्याप एकाही इच्छुकाने अर्ज दाखल केलेला नाही.

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यामुळे इच्छुकांना अजूनही बराच मोठा कालावधी मिळणार आहे. सोमवार ते गुरुवार या पुढील चार दिवसात अजूनही बरेच उमेदवार पुढे येण्याची शक्यता असून त्याच दरम्यान पंचायतींसाठीही अर्ज दाखल हेण्याची शक्यता आहे.

दि. 9 एप्रिल रोजी छाननी होणार आहे. 10 रोजी अर्ज मागे घेण्यात येतील व त्याच दिवशी अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतरचे दिवस प्रचारासाठी असतील व दि. 23 रोजी निवडणूक होणार आहे. दि. 26 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील.

Related Stories

बागवाडा मोरजी येथे पायवाटेवरून तणाव

Amit Kulkarni

सरकार विरेधात काँग्रेसचा निषेध मोर्चा

Amit Kulkarni

कोकण रेल्वेच्या खासगीकरणाला कडाडून विरोध करणार

Patil_p

आरोग्य खाते कोविड रुग्णांची निगा घेण्यास असमर्थ

Patil_p

मोपा विमानतळाची सुरु जनसेवा!

Amit Kulkarni

महापौर, उपमहापौर निवडणूक उद्या

Patil_p