Tarun Bharat

पंचायत निवडणुका मे महिन्याच्या अखेरीस

राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती

प्रतिनिधी /पणजी

राज्यातील पंचायत निवडणुका मे महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती यांनी दिली असून वॉर्ड अंतिम पुनर्रचना 11 एप्रिल रोजी प्रकाशित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचायत वॉर्ड पुनर्रचनेसंदर्भात 913 आक्षेप/सूचना  (दावे) आल्या असून त्या आयोगाच्या विचाराधीन आहेत. उत्तर गोव्यातून 650 तर दक्षिण गोव्यातून 263 दावे आयोगाकडे नोंद झाले आहेत. एकाच घरातील मतदारांना दोन वॉर्डात विभागण्यात आले असल्याच्या तक्रारी असून वॉर्डाची सीमाही बदलण्यात आल्यामुळे आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. आरक्षणातही घोळ झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याबाबत आयोग योग्य ती प्रक्रिया करणार असून त्यानुसार वॉर्डात बदल होतील, असे रमणमूर्ती म्हणाले.

वॉर्ड पुनर्रचनेचा अंतिम मसुदा 14 मार्च रोजी तयार करण्यात येणार असून तो 17 मार्च रोजी सरकारकडे छाननी-मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. तेथून तो 4 एप्रिल रोजी आयोगाकडे येणार असून 11 एप्रिलला त्याचे प्रकाशन होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Related Stories

साळ गावात यावषीही महापुराचा धोका.

Omkar B

फर्मागुडीत आज शिवजयंती उत्सव

Patil_p

कोलव्यात एकास धमकी, कारची हानी

Amit Kulkarni

मांद्रे वाणिज्य महाविद्यालय प्राचार्यपदी तुषार अणवेकर

Amit Kulkarni

मंत्री राणे सूडाने आपला धंदा बंद पाडू पाहतात

Amit Kulkarni

फेसबुकद्वारे लाखो रुपयांना गंडा घालणाऱया संशयिताला अटक

Patil_p